Join us  

म्हणून अंगद बेदीला दिलजित दोसांझचा वाटतो अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 10:42 AM

अंगदचा कल मनोरंजन क्षेत्राकडे अधिक होता. यासंदर्भात अंगद म्हणाला, मला मनोरंजन क्षेत्रातच करिअर करावी, अशी पहिल्यापासून इच्छा होती.

आपल्या ‘सूरमा’  या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी गायक-अभिनेता दिलजित दूसांज आणि त्याचा सह-कलाकार अंगद बेदी हे नुकतेच रवी दुबे होस्ट असलेल्या ‘सबसे स्मार्ट कौन?’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात गप्पांच्या ओघात अंगद बेदीने सांगितले की त्याचे वडील व नामवंत गोलंदाज बिशनसिंह बेदी यांना मीसुध्दा क्रिकेटपटू व्हावे, असे वाटत होते. आपण दिल्लीतर्फे अंडर-19 संघात सहभागी झालो असलो, तरी भारतीय संघात माझी निवड होऊ शकली नाही. “माझ्या वडिलांनी तेव्हा मला सांगितलं की मी जर भारतीय संघात स्वत:ची निवड करून घेऊ शकलो नाही, तर मी दुसर्‍्या क्षेत्रात कारकीर्द केलेली बरी. कारण 18-19 वर्षांचे अनेक गुणी खेळाडू भारतीय संघात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मला दुसरा पर्यायच नव्हता,” असे अंगद बेदीने सांगितले.बिशनसिंह बेदींना आपल्या मुलाने क्रिकेटपटू व्हावे, असे जरी वाटत असले, तरी स्वत: अंगदचा कल मनोरंजन क्षेत्राकडे अधिक होता. यासंदर्भात अंगद म्हणाला, मला मनोरंजन क्षेत्रातच करिअर करावी, अशी पहिल्यापासून इच्छा होती. त्यामुळे मला अमिताभ बच्चन (पिंक) आणि दिलजित दूसांज ( सूरमा) यांच्यासारख्या कलाकारांबरोबर भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद वाटतो.”तो सांगतो, “मी शीख आहे आणि मी दिलजित पाजी यांच्याप्रमाणेच एकाच गुरूला पूजतो. भारतातील लक्षावधी तरुणांप्रमाणेच तो माझं एक प्रेरणास्थान आहे. मला त्याच्या पगडीचा खूपच अभिमान वाटतो. मी त्याचा फार मोठा चाहता आहे.”हे ऐकल्यावर दिलजितने आपल्या जागेवरून उठून अंगदला मिठी मारली. यावेळी दोघेही भावूक झाले होते. यांना दोघांना बघून सारेच काहीवेळ नि:शब्द झाले.

सध्या ‘सबसे स्मार्ट कौन?’या कार्यक्रमात  रवी दुबेची ड्रेसिंग स्टाइल अधिक लक्षवेधी ठरत आहे.टीव्ही असो किंवा बॉलीवूड अभिनेते  लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग दिसतात.रवी दुबेच्या ड्रेसिंग,हेअर स्टाइल अशा अनेक गोष्टी रवी दुबेची पत्नी सरगुनच याकडे बारकाईने लक्ष देते.रवी सध्या नवीन शो सबसे स्मार्ट कौन?चे सूत्रसंचालन करत आहे.