Join us  

‘राधाकृष्ण’ मालिकेसाठी हेमा मलिनी बनल्या नृत्यदिग्दर्शिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 1:45 PM

‘राधाकृष्ण’ मालिेकेसाठी हेमा मालिनी एक विशेष नृत्य बसवणार आहे. सुमेध मुदगलकर या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारायला मिळाल्यामुळे सुमेध सध्या खूपच खूश आहे.

ठळक मुद्देया मालिकेतील एक विशेष नृत्य हेमा मालिनी बसवणार आहेतसुमेध मुदगलकर या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारत आहे

आपल्या विविध संगीतमय प्रोमोंमुळे ‘स्टार भारत’वरील ‘राधाकृष्ण’ ही आगामी मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बॉलीवूडच्या उत्कृष्ट नर्तिका अभिनेत्री हेमा मालिनी या कृष्णभक्त असून त्यांचे लवकरच या मालिकेशी एक खास नातं जोडले जाणार आहे. स्वत: उत्कृष्ट नर्तिका असलेल्या हेमा मालिनी मलिकेतील एका खास प्रसंगासाठी विशेष नृत्य बसविण्याची विनंती करण्यात आली आहे. या मालिकेशी संबंधित एका सूत्राने सांगितले, “आमच्या टीमने हेमा मालिनीशी संपर्क साधला असून तिच्याशी रासलीलेतील एका नृत्याविषयी चर्चा केली आहे. यातील राधा आणि कृष्णाचे प्रेम व्यक्त करण्याच्या एका नृत्याविष्काराचे आयोजन हेमा मालिनी करणार आहेत. 

निखळ, विशुध्द आणि दैवी प्रेमाचे अजरामर प्रतीक असलेली राधा-कृष्णाची प्रेमकथा तिच्या भव्य आणि सुंदर आविष्करामुळे प्रेक्षकांचे लक्ष निश्चितच वेधून घेईल. नेहमीच पौराणिक मालिकेला रसिकांचे प्रचंड प्रेम मिळत आले आहे. पौराणिक मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा रसिकांना प्रचंड आवडत असतात. राधा कृष्ण ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला देखील प्रेक्षकांचा प्रेम सुरुवातीपासूनच मिळते आहे. सुमेध मुदगलकर या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारायला मिळाल्यामुळे सुमेध सध्या खूपच खूश आहे. या मालिकेतील कृष्णाची भूमिका महत्त्वाची असल्याने या भूमिकेसाठी अनेक कलाकारांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. ही एक संगीत मालिका असून त्यात रासलीलेच्या विविध भावना व्यक्त करताना नृत्य आणि संगीताचा वापर केला जाणार आहे.

टॅग्स :राधा कृष्णहेमा मालिनी