Join us  

हीना खान म्हणून झाली उदास, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 1:16 PM

ती लाइन्स चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार असून राहत काजमी, तारीक खान आणि जेबा साजिद हे त्याचे निर्माते आहेत.

ठळक मुद्दे हीनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल. हीनाने फोटो शेअर करत अनवेल असं कॅप्शन दिले आहे. हीना फिटनेसबाबत इतर अभिनेत्रींपेक्षा अधिक सजग .

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हीना खान लवकरच रुपेरी पडद्यावर एंट्री करणार आहे. 'लाइन्स' या चित्रपटातून ती हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. छोट्या पडद्यावरील सगळ्यात मोठा शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये हीनाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका रसिकांना भावली आहे.  सोशल मीडियावरही हीना बरीच सक्रीय आहे. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यांत ती आजारी असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा चेहरा उदास दिसत आहे. या फोटोसह अनवेल असं कॅप्शन तिने दिले आहे.

 

फिटनेसबाबत इतर अभिनेत्रींपेक्षा अधिक सजग असलेली हीना आजारी असल्याचं पाहून तिच्या चाहत्यांची काळजी वाढली आहे. कारण काही दिवसांपूर्वी हीनाने तिचा जिमचा व्हिडिओ शेअर केला होता. यांत ती खांद्याने वजनदार वस्तू ओढत असल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच योग करतानाचे व्हिडिओसुद्धा ती शेअर करत असते.

फिटनेस, सौंदर्य आणि अभिनयामुळे रसिकांची लाडकी अभिनेत्री ती बनली आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर आजारातून बरी व्हावी अशी रसिकांची इच्छा आहे. तसंच छोट्या पडद्यापाठोपाठ रुपेरी पडद्यावरही तिची इनिंग सुपरहिट ठरावी अशी रसिकांची इच्छा आहे. ती लाइन्स चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार असून राहत काजमी, तारीक खान आणि जेबा साजिद हे त्याचे निर्माते आहेत. 

 

टॅग्स :हिना खान