चित्रपटांचा ‘वारसा’ चालविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 13:00 IST
आई शुभा खोटे, मामा विजू खोटे यांचे बॉलिवूडपटांमध्ये योगदान राहिल्याने, मी चित्रपटात केव्हा झळकणार, असा मला सातत्याने प्रश्न विचारला ...
चित्रपटांचा ‘वारसा’ चालविणार
आई शुभा खोटे, मामा विजू खोटे यांचे बॉलिवूडपटांमध्ये योगदान राहिल्याने, मी चित्रपटात केव्हा झळकणार, असा मला सातत्याने प्रश्न विचारला जातो. छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळल्याने मोठ्या पडद्यावरही तुला प्रेक्षक स्वीकारतील, मग तू का प्रयत्न करीत नाहीस, असा सल्लाही मित्रपरिवाराकडून दिला जातो. त्यामुळे मला सांगावेसे वाटते की, मी चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सुक असून, चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. अर्थात, माझा ड्रिम रोल चॅलेंजेबल असेल यात शंका नाही; कारण परिवाराकडून आलेला चित्रपटांचा वारसा मलाच चालवावा लागेल, असे मला वाटते. ‘वारिस’ या मालिकेतून पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत झळकणाºया भावना बलसावर यांनी मोठ्या पडद्यावर झळकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्याशी साधलेला संवाद...- प्रेमळ, नटखट भूमिकेत दिसणाºया भावना बलसावर आता नकारात्मक भूमिकेत दिसणार, ही भूमिका निवडण्यामागचे नेमके कारण काय? प्रत्येक कलाकाराला वेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याची इच्छा असते. शिवाय एखाद्या भूमिकेत दम असेल तर त्या भूमिकेचा नक्कीच मोह होतो. मला या भूमिकेबाबत मोह झाला. खरं तर माझी इमेज कॉमेडी कलाकार म्हणून आहे; मात्र मला अजिबात कॉमेडी करायची नव्हती. जेव्हा मी ‘गुटरगू’ या संंवाद नसलेल्या मालिकेची स्क्रिप्ट वाचली, तेव्हा मला ही भूमिका आव्हानात्मक वाटली. अशीच आव्हानात्मक भूमिका ‘वारिस’ या मालिकेतील आहे. केवळ नकारात्मक ही एकच बाजू या भूमिकेमागे नसून, त्यातील आव्हानेदेखील विचार करण्यास भाग पाडणारी आहेत. प्रेक्षक मला कॉमेडी कलाकार म्हणून बघत असल्याने नकारात्मकतेला विनोदी पंचही देण्यात आल्याने प्रेक्षक मला स्वीकारतील, यात शंका नाही. - इतर मालिकांप्रमाणे ‘किचन पॉलिटिक्स’ बघावयास मिळेल का? माझ्या मते, ‘किचन पॉलिटिक्स’ हा शब्द फारच त्रोटक आहे; कारण मालिकेत अक्षरश: महाभारत बघावयास मिळणार आहे. मी ज्या सासूच्या भूमिकेत आहे ती प्रेमळ किंवा गोड गोड बोलणारी नसून, पाठीत सुरा खुपसणारी आहे. त्यामुळे मला या पात्रासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली, यात दुमत नाही. मालिकेत भोजपुरी भाषेतील संवाद असल्याने त्याचा ताळमेळ लावणे जरा कठीणच होते; परंतु माझे बरेचसे बिहारी मित्र मालिकेत असल्याने त्यांच्याकडून मला भरपूर मदत झाली. सध्या मी भोजपुरी भाषा शिकत आहे. या सर्व गोष्टींवरून तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की, ही भूमिका आव्हानात्मक आहे. - मोठ्या ब्रेकनंतर मालिकेत परतल्या, मधल्या काळात तुम्ही थिएटर्समध्ये व्यस्त होत्या का? मी खूप कमी मालिकांमध्ये काम करते, हे खरं आहे; परंतु मधल्या काळात मी ‘सतरंगी ससुराल’ या डेली सोपमध्ये काम केले होते. खरं तर माझ्या ब्रेकबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे. ‘तू बºयाच दिवसांपासून गायब आहेस, कुठल्या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती’ असे जेव्हा लोक मला विचारतात, तेव्हा मला भरून आल्यासारखे वाटते अन् थिएटर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नाटकांमध्ये काम करणे हे सुरूच असते. वास्तविक मी थिएटर्सपासून दूर जाऊच शकत नाही. डेली सोपमध्ये मी कितीही व्यस्त असले, तरी वेळचे नियोजन करून थिएटर्स करतेच. - पूर्वीच्या अन् आताच्या मालिकांकडे तुम्ही कसे बघता? पूर्वी मालिकांमध्ये भूमिका साकारताना पुरेसा वेळ मिळत असे; मात्र हल्ली डेली सोपमुळे तेवढा वेळ मिळत नाही. अर्थातच, याचा परिणाम क्वॉलिटीवर होत आहे. त्यातच हल्ली ‘कमशर््िायल’ हा भाग जास्त प्रभावी ठरू लागल्याने क्वॉलिटीपेक्षा क्वॉँटिटीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. एका मालिकेचे बजेट चित्रपटाच्या बजेटएवढे असते. त्यामुळे कलाकारांवर या सर्व गोष्टींचे दडपण असते. त्यातून उत्कृष्ट परफॉर्मन्स देणे हे एकप्रकारे आव्हानच असते. - तुम्हाला मालिकांपेक्षा चित्रपट पाहायला आवडतात असे ऐकले आहे, हे खरे आहे का ? खरं आहे, मी जरी मालिकांमध्ये काम करीत असले, तरी मला चित्रपट बघायला खूप आवडतात. फ्रायडेला रिलीज झालेला चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो कसा बघता येईल यासाठी माझी नेहमीच धडपड असते. बºयाचदा एकाच दिवशी दोन ते तीन चित्रपट रिलीज होतात. त्यामुळे संपूर्ण दिवस थिएटरमध्येच जातो. ही आवड मला पूर्वीपासूनच आहे. - इतकी वर्षं इंडस्ट्रीत काम केल्यानंतर एखादी भूमिका करायची राहून गेली आहे असे तुम्हाला वाटते का? मला ज्या भूमिकांमध्ये आव्हान असतात अशा भूमिका करायला आवडतात. मी अशाच एखाद्या आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात आहे. अन् मला अपेक्षा आहे की, लवकरच माझा शोध संपेल. सध्या तरी मी थिएटर्स आणि ‘वारिस’ या मालिकेकडे लक्ष केंद्रित केले आहे; परंतु दमदार भूमिका मिळाल्यास चित्रपटातही नशीब आजमावणार, यात शंका नाही. खरं तर मी चित्रपटात भूमिका साकारावी, अशी बºयाच लोकांची इच्छा आहे. त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे.