Join us

हरभजनने वाटली मिठाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 15:14 IST

मझाक मझाक में या कार्यक्रमात सध्या हरभजन परीक्षकांची भूमिका साकारत आहे. हरभजनची पत्नी अभिनेत्री गीता बसराने काही दिवसांपूर्वी एका ...

मझाक मझाक में या कार्यक्रमात सध्या हरभजन परीक्षकांची भूमिका साकारत आहे. हरभजनची पत्नी अभिनेत्री गीता बसराने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. गीता लंडनमध्ये असल्याने हरभजनदेखील काही दिवस तिथेच होता. त्यामुळे त्याला मझाक मझाक या कार्यक्रमाच्या काही भागांचे चित्रीकरण करता आले नव्हते. पण तो आता लंडनवरून परतला असून सध्या प्रचंड खूश आहे. त्याने त्याचा हा आनंद कार्यक्रमाच्या टीमसोबत साजरा केला. त्याने सेटवर सगळ्यांना मिठाई वाटली.