Join us  

गुरमीत चौधरी-देबीना बॅनर्जीचा कोविड रिपोर्ट निगेटीव्ह, अभिनेता म्हणाला- 14 वर्षांच्या वनवासाप्रमाणे कोरोनामध्येही वनवास

By गीतांजली | Published: October 15, 2020 1:03 PM

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जीचे कोव्हिड-19 रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहेत.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल गुरमीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी यांची कोरोना टेस्ट 30 सप्टेंबरला पॉझिटीव्ह आली होती. ज्यानंतर दोघे होम क्वाॅरंटाईन झाले होते. रिपोर्टनुसार 14 दिवसांनी दोघांची कोरोना टेस्ट नेगेटीव्ह आली आहे. कोरोनामुक्त झाल्यावर सोशल मीडियावर गुरमीतने लिहिले, ''बुधवारी माझे आणि माझी पत्नी देबीनाचे कोरोना रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहेत. मी देवाचा आणि चाहत्यांचा आभारी आहे. कोरोनाला हलक्यात घेऊन नका. आपली आणि आपल्या कुटुंबांची काळजी घ्या. मास्क लावा.. ''  

बीएमसी आणि डॉक्टरांचे मानले आभारगुरमीत पुढे लिहितो, ''बीएमसीचा आभारी आहे त्यांनी आमची 5 ते 6 वेळा खूप मदत केली. या महामारीमध्ये आपले डॉक्टर्सचं खरे हिरो आहेत. सगळ्यांंचे पुन्हा एकदा मनापासून आभार.'' 

कोव्हिड 19 मध्ये 14 दिवसांचा वनवास कोरोनावर गुरमीत चौधरीनने एक व्हिडीओ तयार केला आहे. जो त्याने त्याच्या युट्यबू अकाऊंटवर शेअर केला आहे. यात अभिनेता म्हणतो, ज्या प्रमाणे 14 वर्षांचा वनवास होता तसाच कोव्हिड 19 मध्ये 14 दिवसांचा वनवास असतो. आमच्यासाठी 14दिवस कठीण होते. आमच्यासोबत देबीनाचे आई-वडील सुद्धा राहतात ते सुद्धा पॉझिटीव्ह आले होते. अनेकवेळा त्यांची ऑफिसिजन लेव्हल कमी व्हायची म्हणून ज्येष्ठ नागरिकांची याकाळात विशेष काळजी घ्या. 

राम-सीताची साकारली भूमिकाछोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत गुरमित चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती.दोघे रियल लाइफ पती पत्नी या पौराणिक मालिकेच्या निमित्ताने राम-सीता या पौराणिक पती-पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले होते. गुरमीतबद्दल सांगायचे तर मायावी, रामायण, गीत अशा अनेक मालिकांत काम केल्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. कोई आप सा या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर खामोशियां, मिस्टर एक्स, वजह तुम हो,लाली की शादी में लड्डू दीवाना, पलटन आदी चित्रपटांत तो दिसला.

टॅग्स :गुरमीत चौधरी