Join us  

रीहान रॉयचा असाही संघर्ष !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 2:00 PM

या मालिकेत पोलिस निरीक्षक पर्व या खलनायकाची भूमिका करणारा अभिनेता रीहान रॉय याने ही गोष्ट आपल्या उदाहरणाने सिध्द करून दाखवले आहे.

आपल्याला काय करायला जमेल आणि काय नाही, याविषयी दुस-या लोकांच्या मतांना महत्त्व न देता आपल्या मनातील एखाद्या गोष्टीविषयीची भीती व शंका दूर सारून ती साध्य करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केल्यास त्याला ती गोष्ट नक्कीच जमते, असा संदेश ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेतून दिला जात आहे. या मालिकेत पोलिस निरीक्षक पर्व या खलनायकाची भूमिका करणारा अभिनेता रीहान रॉय याने ही गोष्ट आपल्या उदाहरणाने सिध्द करून दाखवले आहे.

एखाद्या गोष्टीविषयी आपल्या मनात बसलेली भीती निग्रहाने दूर सारून ती करण्याचा प्रयत्न केल्यास आपण ती गोष्ट साध्य करू शकतो, हे रीहानने दाखवून दिले आहे. रीहानला उंच जागांची खूप भीती (अ‍ॅक्रोफोबिया) वाटते. पण या मालिकेतील एका प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याने आपल्या मनातील ही भीती दूर सारून हा प्रसंग समर्थपणे चित्रीत केला. त्यामुळे या मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना इन्स्पेक्टर पर्व आणि सिध्दी (गरिमा) यांच्यातील एक नाट्यपूर्ण अ‍ॅक्शनप्रसंग एका इमारतीच्या गच्चीवर चित्रीत केलेला पाहत येईल.

या प्रसंगात रीहानला या इमारतीच्या गच्चीच्या कट्ट्यावर उभे राहून हा प्रसंग चित्रीत करायचा होता. उंच जागांची भीती बसलेल्या रीहानच्या दृष्टीने ही गोष्ट फारच भीतीदायक होती. तेव्हा मालिकेच्या दिग्दर्शकाने त्याला पाठीला दोर बांधून देण्याची सूचना केली; पण आपल्या मनातील उंच जागांच्या भीतीवर मात करण्याचा निर्धार केलेल्या रीहानने ती सूचना फेटाळून लावली आणि त्याशिवायच हा प्रसंग अचूक चित्रीत केला.

आपल्या अ‍ॅक्रोफोबियाच्या विकाराबद्दल रीहान म्हणाला, “इतर सामान्य माणसांप्रमाणे मलाही काही गोष्टींची भीती वाटते. मला उंच जागांची भीती वाटते, हे खरं; पण केव्हा तरी माणसाला आपल्या मनातील अशा भीतीचा सामना करावाच लागतो आणि त्यावर मात करावी लागते. या विशिष्ट प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळीही मी हीच गोष्ट केली. सुरुवातीला मी या गोष्टीला भीतच होतो- पण मग मी माझ्या मनाला बजावलं- तुमसे हो पाएगा, रीहान आणि मी सरळ तो प्रसंग चित्रीत करून टाकला. कारण जिंदगी मै कभी कभी रिस्क लेना चाहिए, एण्ड रिझल्ट अच्छा होता है!”