Join us

गोविंदाने भाभीजीसह धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 17:47 IST

'भाभीजी घर पर है' म्हणत अनेक सेलिब्रेटींनी या मालिकेत एंट्री करत धम्माल उडवून दिलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. नुकतेच ...

'भाभीजी घर पर है' म्हणत अनेक सेलिब्रेटींनी या मालिकेत एंट्री करत धम्माल उडवून दिलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. नुकतेच या मालिकेत सनी लिओनी, बिपाशा बासू पती करणसिंग ग्रोवरसह येऊन गेली होती.पुन्हा एकदा या मालिकेत एका सेलिब्रेटीची धम्माल पाहायला मिळणार आहे.भाभीजीला भेटण्यासाठी खास गोविंदाने ही या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.गोविंदाने त्याच्या हटक्या लूकमध्ये सेटवर हजेरी लावताच कलाकरांनी त्याचे खास स्वागत केले. गोविंदाबरोबर खास गप्पा मारल्या. नुकतेच अंगुरीच्या आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अंगुरी विभूतींजीसह रेशीमगाठीत अडकणार असल्याचा सिक्वेन्स पाहायला मिळाल्यानंतर पुन्हा एकदा रसिक गोविंदाच्या येण्याने हसूनहसून लोटपोट होणार आहेत. विशेष म्हणजे गोविंदाने या कार्यक्रमात नुसतीच हजेरी लावली नाही. ''अखियों से गोली मारे'' या गाण्यावर गोविंदासह मालिकेतील कलाकरांनीही मोठ्या उत्साहात ताल धरला. त्यामुळे गोविंदाची विनोदाची फटकेबाजीसह खास गोविंदा स्टाइल डान्स छोट्या पडद्यावर पाहाणे रसिकांसाठी नक्की ट्रीट ठरणार आहे.