Join us  

गोविंदाने 'या' दिग्दर्शिकेचे मानले आभार, स्ट्रगलिंग डेजमध्ये केली होती मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 7:15 AM

'डान्स दीवाने' शोच्या मंचावर गोविंदा भावुक झाला आणि त्याला त्याचे पूर्वीचे अभिनयाच्या सुरूवातीचे दिवस आठवले.

स्ट्रगल हा कोणालाच चुकला नाही. मग तो बॉलिवूडचा चीची गोविंदाला तरी कसा सुटणार. सिनेसृष्ट्रीत करिअर करण्यासाठी गोविंदाने जेव्हा एंट्री केली होती. त्यावेळी त्याला एका व्यक्तीने मदतीचा हाथ पुढे केला होता. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान. नुकतेच 'डान्स दीवाने' शोच्या मंचावर गोविंदाने हजेरी लावली होती. यावेळी पहिल्यांदाच आपल्या काही गुपितं त्याने उघड केली. त्यावेळी स्ट्रगल करत असताना कशा प्रकारे फराह खानने त्याला मदत केली आणि यावेळी तिचे आभारही मानायला तो विसरला नाही. आजही गोविंदा त्याला मदत केलेल्या व्यक्तींना विसरलेला नाही.

यावेळी गोविंदा स्पेशल रंगलेल्या या भागात अनेक स्पर्धकांना गाजलेल्या गाण्यांवर डान्स करत रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. तसेच स्पर्धक गोपाल आणि त्याच्या कुटुंबियांच्या संघर्षा विषयी ऐकल्या नंतर, गोविंदा भावुक झाला आणि त्याला त्याचे पूर्वीचे अभिनयाच्या सुरूवातीचे दिवस आठवले. गोविंदाने सांगीतले की स्ट्रीट डान्सर हे त्याच्या सिनेमाच्या करियर मधील पहिले गाणे होते. त्याने पुढे सांगीतले की या स्थितीत फराह खानने त्याला खूप मदत केली, तिच्या मुळे त्याला डान्स चाली शिकता आल्या होत्या आणि 15 दिवसात चित्रीकरण पूर्ण करता आले होते.

यावर बोलताना, गोविंदा म्हणाला, जेव्हा मी पहिल्यांदा जावेद जाफरीला डान्स करताना पाहिले होते तेव्हा त्याच्या अद्भूत डान्स चालींनी मी विस्मयचकित झालो होतो. त्या क्षणी माझ्या मनात असा विचार आला होता की असा डान्स मी करू शकेन का. त्यानंतर मी फराह खानला मदतीविषयी विचारले, तिच्या कडे त्यावेळी टेपरेकॉर्डर ती वापरत असे मग मी तिला त्यावर सराव करू का असे विचारले असता तिने लगेच ते मान्य केले. त्यावेळी तिने मला मदत केली आणि मी अजूनही तिचे त्यासाठी आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो माझ्या सुरूवातीच्या दिवसात मला मदत करण्यासाठी.”

टॅग्स :गोविंदाफराह खान