Join us

गेला उडत... ७ मे पासून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 11:36 IST

 केदार शिंदे दिग्दर्शित गेला उडत या नाटकची चर्चा सध्या खूप जोर धरू लागली आहे. कारण गेली कित्येक दिवस सोशलमिडीयावर ...

 केदार शिंदे दिग्दर्शित गेला उडत या नाटकची चर्चा सध्या खूप जोर धरू लागली आहे. कारण गेली कित्येक दिवस सोशलमिडीयावर गेला उडत याचे जोरदार प्रमोशन चालू होते. तसेच सर्व मराठी कलाकार या नाटकासाठी शुभेच्छा देखील देत होते. पण या नाटकात सिद्धार्थ जाधव असणार आहे एवढेच माहित होते. याव्यतिरिक्त या नाटकाविषयी सर्व माहिती गुलदस्त्यात होती. फायनली या नाटकवरचा पडदा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना उघडला, ते म्हणाले हे नाटक माझ्या स्टाइलचे म्हणजेच पूर्णपणे कॉमेडी असणार आहे.सध्या या नाटकाची तालीम चालू आहे. प्रेक्षकांची धमाल उडविणाºया गेला उडत या नाटकमध्ये प्रमुख भूमिकेत सिध्दार्थ जाधव दिसणार आहे. याव्यतिरिक्त या नाटकमध्ये दहा कलावंतांचा समावेश आहे. तसेच या दहामध्ये अर्चना, संदेश उपशाम यांसारखे तरूण कलाकार या विनोदी नाटकमध्ये झळकणार आहे. अर्चना या अभिनेत्रीने का रे दुरावा या मालिकेतून जुहीची भूमिका यशस्वीरीत्या निभावली होती.या नाटकाचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या समवेत सिध्दार्थ जाधव या तगडयाअभिनेत्याचा नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जबरदस्त परफॉर्मन्स पाहण्यासाठी गेला उडत  या नाटकची वाट मात्र प्रेक्षकांना ७ मे पर्यत पाहावी लागणार आहे.