देव त्याच्या निर्णयावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:07 IST
कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत सोनाक्षीने सगळे काही विसरून रितविकसोबत लग्न करण्याचे ठरवले आहे. सोनाक्षी आणि ...
देव त्याच्या निर्णयावर ठाम
कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत सोनाक्षीने सगळे काही विसरून रितविकसोबत लग्न करण्याचे ठरवले आहे. सोनाक्षी आणि रितविकसाठी देव एक सरप्राईज प्लान करणार आहे. तो त्या दोघांसाठी एक संपूर्ण हॉटेल बुक करणार आहे. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर हा प्लान सोनाक्षीने केला असे रितविक समजणार आहे. तर रितविकने आपल्याला सरप्राईज दिल्याचे सोनाक्षीला वाटणार आहे. पण त्या दोघांचाही हा प्लान नसून तो प्लान देवचा आहे हे कळल्यावर सोनाक्षी देववर प्रचंड चिडणार आहे आणि त्यामुळे देव खूप दारू पिणार आहे. दारू पिऊन आईसमोर जाऊ शकत नाही याची कल्पना असल्याने देव ऑफिसमध्येच झोपणार आहे. पण हे कळल्यावर सोनाक्षी त्याला भेटायला जाणार आहे. सोनाक्षीला पाहिल्यावर तो आजही तिच्यावर प्रेम करतो हे तो तिच्यासमोर कबूल करणार आहे. पण आईचा विरोध असल्याने लग्न करणे अशक्य असल्याचे तो तिला सांगणार आहे. त्यामुळे तो तिच्यापासून दूर राहाण्याच्या निर्णयावरच ठाम राहाणार आहे. सोनाक्षी आणि देवच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच वाईट बातमी आहे.