Join us

इटलीमध्ये दिव्यांका त्रिपाठीचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 11:30 IST

गेल्याच वर्षी 2016वर्षी दिव्यांका आणि विवेक दोघांनी 8 जुलैला भोपाळमध्ये थाटात लग्न केले होते.

मोस्ट लव्हेबल टीव्ही कपल म्हणून ओळखले जाणारे दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहीया यांच्या लग्नाला नुकतेच वर्ष पूर्ण झाले आहे. तसेच यंदाचे 'नच बलियेचे 8' वे पर्व ही या जोडीने जिंकले आहे.त्यामुळे असे दुहेरी सेलिब्रेशनचे निमित्त या कपलकडे होते. त्यामुळे ही दोघे त्यांचे खास क्षण सध्या इटलीमध्ये एन्जॉय करत आहेत.'नच बलिये'मुळे दोघेही बिझी होते.एक से बढकर एक परफॉर्मन्स देत या दोघांनी नच बलियेचे विजेते पद पटकावले.सतत बिझी शेड्युअलमुळे आता हे दोघे एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत. दिव्यांकाने त्यांचे इटलीमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिव्यांकाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.इटलीतले नयरम्य स्थळांना भेट देत तेथील आकर्षक लोकेशन्स तिने कॅमे-यात कॅप्चर केले आहे.   गेल्याच वर्षी 2016वर्षी  दिव्यांका आणि विवेक दोघांनी 8 जुलैला भोपाळमध्ये थाटात लग्न केले होते.त्यानंतर खास आपल्या मित्रांसाठी दिव्यांकाने मुंबईतही रिसेप्शन पार्टी दिली होती.आता लग्नाला वर्ष पूर्ण झाले म्हटल्यावर आणखी स्पेशल बनवण्यासाठी  दोघेही फॉरेन टुर करत आहेत.'ये हे मोहोब्बते' मालिकेत दिव्यांका इशिताचा रोल करत आहे तर याच मालिकेत विवेक एसीपी अभिषेकची भूमिका करत होता. या मालिकेच्या सेटवरच दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली आणि त्यानंतर कुटुंबियाच्या सहमीतनुसार लग्न केले.आज दोघेही खूप आनंदात मॅरिड लाईफ एन्जॉय करताना दिसतायेत.जेव्हा वेळ मिळतो तसे हे कपल एकमेकांसोबत क्लॉलिटी टाईफ घालवताना दिसतात.दिव्यांकाने लग्नानंतर इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले. चाहत्यांशी कनेक्ट राहाता यावे म्हणूनत ती सतत तिच्या अपडेट सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.