दिव्यांकाला मिळाले गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 10:57 IST
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला. दिव्यांका आणि विवेक दोघांनीही त्यांच्या मालिकेच्या चित्रीकरणाला ...
दिव्यांकाला मिळाले गिफ्ट
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला. दिव्यांका आणि विवेक दोघांनीही त्यांच्या मालिकेच्या चित्रीकरणाला आता सुरुवातही केली आहे. दिव्यांकाच्या बहिणींनी त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला म्हणून एक छानसे गिफ्ट त्यांना दिले आहे. त्यांनी दिव्यांकाला एक ट्रेझर बॉक्स दिला असून या बॉक्समध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो आहेत. दिव्यांकाला तिच्या बहिणींनी दिलेले हे गिफ्ट खूपच आवडले असल्याचे ती सांगते. दिव्यांकाने या गिफ्टचे फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत.