विशालचे स्वागत झाले जोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 13:15 IST
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका गेली कित्येक वर्षं करण मेहरा साकारत होता. पण करणने त्याच्या ...
विशालचे स्वागत झाले जोरात
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका गेली कित्येक वर्षं करण मेहरा साकारत होता. पण करणने त्याच्या आजारपणामुळे काही महिन्यांपूर्वी या मालिकेला रामराम ठोकला आणि आता या मालिकेत देख भाई देख या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अभिनेता विशाल सिंग नैतिकची भूमिका साकारणार आहे. विशालचे मालिकेच्या सेटवर त्याच्या सहकलाकारांनी खूपच चांगले स्वागत केले. याविषयी विशाल सांगतो, "मला मालिकेसाठी विचारण्यात आल्यावर क्षणाचाही विचार न करता मी या मालिकेसाठी होकार दिला. करणने नैतिकची भूमिका खूपच चांगल्यारितीने साकारली होती. आजही तो प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. प्रेक्षकांनी करणला जितके प्रेम दिले तितकेच ते मलाही देतील अशी मला आशा आहे."