Join us

रेतीमध्ये गायत्री साकारणार चॅलेंजींग रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 06:08 IST

           परतू चित्रपटामधुन ग्रामीण टच असलेली भुमिका साकारणारी गायत्री सोहम तिच्या आगामी रेती या ...

           परतू चित्रपटामधुन ग्रामीण टच असलेली भुमिका साकारणारी गायत्री सोहम तिच्या आगामी रेती या सिनेमामध्ये चॅलेंजींग रोल करणार आहे. सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये गायत्रीने रेती चित्रपटातील तिच्या सुली या व्यक्तीरेखेविषयी सांगितले. चिन्मय मांडलेकर या सिनेमात शंकºया नावाचे कॅरेक्टर करीत आहे. तर गायत्रीने शंकºयाच्या प्रेमात अखंड बुडालेल्या प्रेयसीची भुमिका रंगवलेली आहे.           चिन्मय सोबत काम करण्यास मी खुप उत्सुक होते. या सिनेमातील स्टारकास्ट तगडी असल्याने त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे एक चॅलेंजच होते. एवढेच नाही तर सिनेमात अ‍ॅक्शन सीन्स देखील पहायला मिळणार आहेत यासाठी खास साऊथचे फाईटमास्टर्स बोलविण्यात आले होते. रेती हा शब्द ऐकल्यावर आपल्याला वाळू माफिया संदर्भातील कथा असल्याचे वाटू शकते. परंतू गायत्रीने कथेचा खुलासा अजुन तरी केल्या नसल्याने नक्की रेती आहे काय हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला समजेल. चित्रपटाला बॉलीवुडचा संगीतकार शान याने म्युझिक दिले आहे.