गौरव- कादंबरी पुन्हा एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 22:48 IST
तुझविण सख्या रे या मालिकेतून घराघरात पोहचलेले अन आपल्या अफलातुन केमिस्ट्रीने प्रेक्षकांती मने जिंकलेली ...
गौरव- कादंबरी पुन्हा एकत्र
तुझविण सख्या रे या मालिकेतून घराघरात पोहचलेले अन आपल्या अफलातुन केमिस्ट्रीने प्रेक्षकांती मने जिंकलेली जोडी म्हणजे गौरव घाटणेकर आणि कादंबरी कदम. छोट्या पडद्यावरील दोघांचे ट्युनिंग त्यांचा चाहत्यांना एवढे आवडले कि आता ही जोडी मोठ्या पडद्यावर रोमान्स करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. रेडिओ नाईट्स ६.०.६ हा त्यांचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होते आहे. चित्रपटाचे नाव जसे एकदम हटके वाटते तसेच यामध्ये दोघांच्या भुमिका एकदम हटके आहेत. गौरव म्हणतोय मला आणि कादंबरीला काहीतरी नवीन करायचे होते. या सिनेमाचा विषय वेगळा अन इंटरेस्टींग असल्याने आम्ही तो केला. हा एक सस्पेंस थ्रिलर सिनेमा असुन नक्कीच प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. मी यात रेडिओ जॉकिची भुमिका साकारत आहे. आता पाहुयात यांची मालिकेतील केमिस्ट्री तर प्रेक्षकांना आवडली परंतू सिनेमातील यांचे ट्युनिंग किती जणांना भावतेय ते आपल्याला लवकरच समजेल.