गौरव गेरा झाला आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 17:00 IST
झलक दिखला जा या कार्यक्रमातील सगळीच नृत्य प्रेक्षकांना वेड लावणारी आहेत. प्रत्येक स्पर्धक आपल्यापरीने चांगल्यातला चांगला परफॉर्मन्स सादर करण्याचा ...
गौरव गेरा झाला आऊट
झलक दिखला जा या कार्यक्रमातील सगळीच नृत्य प्रेक्षकांना वेड लावणारी आहेत. प्रत्येक स्पर्धक आपल्यापरीने चांगल्यातला चांगला परफॉर्मन्स सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. गौरव गेरा झलक दिखला जा या कार्यक्रमात चुटकी या त्याच्या मालिकेतील व्यक्तिरेखेमध्येच झळकला होता. त्यामुळे तो मुलीच्याच वेशात या कार्यक्रमात नृत्य करत होता. पण गेल्या आठवड्यात सालसा नृत्य करताना सँडलचे हाय हिल्स त्याच्या स्कर्टमध्ये अडकले आणि याचा तिच्या परफॉर्मन्सवर परिणाम झाला. यामुळे कमी गुण मिळाल्याने गौरवला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. या शोमध्ये मी खूप कमी वेळ असलो तरी हा शो मी खूप एन्जॉय केला असे गौरव सांगतो.