भाषेमुळे जमली गट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 15:50 IST
बहू हमारी रजनी_कांत या मालिकेत पल्लवी प्रधान आणि रिद्धिमा पंडित या दोघी सासू-सूनेच्या भूमिका साकारत आहेत. या दोघींची खऱ्या आयुष्यातील ...
भाषेमुळे जमली गट्टी
बहू हमारी रजनी_कांत या मालिकेत पल्लवी प्रधान आणि रिद्धिमा पंडित या दोघी सासू-सूनेच्या भूमिका साकारत आहेत. या दोघींची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्रीदेखील खूपच चांगली आहे. त्या दोघी मराठी असल्याने मालिकेच्या सेटवर मराठीतच बोलतात. एवढेच नव्हे तर पल्लवी मराठी पद्धतीचे जेवण खूपच छान बनवते. ती खास रिद्धिमासाठी तिचे आवडते पदार्थ बनवून आणते. बहू हमारी रजनी_कांत या मालिकेच्या सेटवर ते दोघे सतत मराठीत बोलत असल्याने इतरांना ते काय बोलतात याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे सेटवर मराठी ही त्यांची कोडभाषा बनली आहे.