Join us

गुलाबाची कळी मॅगोची जबरा फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 09:10 IST

उन्हाळा सुरू झाला की, प्रत्येकाला ओढ लागते ती आंब्याची. कधी एकदाचे घरी आंबे आणतात आणि ते आनंदाने मनसोक्त खाऊ ...

उन्हाळा सुरू झाला की, प्रत्येकाला ओढ लागते ती आंब्याची. कधी एकदाचे घरी आंबे आणतात आणि ते आनंदाने मनसोक्त खाऊ अशी प्रत्येकाची इच्छा देखील असते. मग या आशा मॅगो सीझनमध्ये मराठी सेलिब्रेटी तरी कसे मागे राहतील. अशीच एक मॅगोची जबरा फॅन असलेली सर्वाची आवडती गुलाबाची कळी म्हणजेच तेजस्विनी पंडीत लोकमत सीएनएक्सशी बोलताना म्हणाली, मी आब्यांची भयंकर फॅन आहे. हा फ्रुटच असा आहे की, खूप रेअर मिळतो तसेच वर्षातून एकदाच खायला मिळतो. त्यामुळे मी या महिन्यात भरपूर आंबे खाते. वजनाचा विचार देखील करीत नाही. आणि हीटमुळे चेहरा खराब होईल याची भिती देखील नसते कारण चेहरा परत ठीक होईल पण आंबा खायला मिळणार नाही. आणि आंबे म्हटल्यावर ते फ्रेश असतात की नाही याबाबत देखील शंकाच असते. पण मला अशी कोणतीही भिती नसते. कारण दरवर्षी मला आंबे माझा विघ्नेश दादा आठवणीने फोन करून देतो. हे आंबे त्याच्याच देवघड येथील शेतातील असल्यामुळे कोणताही विचार न करता मी देखील हे आंबे घरातीलच असल्यामुळे बिनधास्तपणे खाते.आय लव्ह मॅगो...असो या सुंदर तेजस्विनीला भरपूर आंबे खायला मिळो.