Join us

मथुरेच्या तीव्र उन्हाळ्य़ात ‘इंतकाम एक मासूम का’चे चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 14:59 IST

आला उन्हाळा आरोग्याला सांभाळा असे आपण म्हणत असतो, रणरणत्या उन्हात बाहेर पडणेही नकोसे होते. मात्र याच रणरणत्या उन्हात दिवसातले ...

आला उन्हाळा आरोग्याला सांभाळा असे आपण म्हणत असतो, रणरणत्या उन्हात बाहेर पडणेही नकोसे होते. मात्र याच रणरणत्या उन्हात दिवसातले 15 /16 तास एका अभिनेत्याने मालिकेसाठी शूटिंग पूर्ण केले आहे. मासूम या आगामी मालिकेच्या काही भागाचे शूटिंग हे मथुराला झाले आहे.इंतकाम एक मासूम का’ या आगामी मालिकेत भूमिका साकारणा-या अविनाश सचदेवा, मेघा गुप्ता, मनीष गोएल तसेच बॉलीवूडमधील आघाडीचा बालकलाकार रिकी पटेल यासारख्या कलाकारांमुळे ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेचे कथानक मथुरा आणि गोकुळ परिसरात घडत असल्याने तेथील नैसर्गिक वातावरणात चित्रीकरण करण्यासाठी मालिकेचे सारे कलाकार व कर्मचारी अलीकडेच मथुरेला गेले होते. सध्याच्या तीव्र उन्हाळ्य़ाच्या वातावरणात मथुरेत चित्रीकरण करणे हे एक आव्हानच होते. अर्थात मनाला स्पर्श करणारा अभिनय करण्यापासून अविनाश सचदेवाला कोणीही रोखू शकत नाही. मथुरा आणि गोकुळ भागात तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असले, तरी त्या वातावरणात अविनाश गेले पाच दिवस चित्रीकरण करीत आहे. आपली भूमिका परिपूर्णतेने करण्याबाबत अविनाश प्रसिध्द असून आपल्या कामात तो कसलाही अडथळा येऊ देत नाही. या तीव्र उन्हाबाबत अविनाशला विचारले असता तो म्हणाला, “सध्या उन्हाळा शिगेला पोहोचला असल्याने अशा वातावरणात चित्रीकरण करणं हे नक्कीच एक मोठं आव्हान आहे. आता मथुरा आणि गोकुळ भागातलं तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं असलं, तरी आमची भूमिका तितक्याच तडफेने सादर करण्याची आमची इचछाशक्ती कमी झालेली नाही. या भूमिकेत मी माझं सर्वस्व ओतलं असून प्रेक्षकांना ही भूमिका पाहायला आवडेल, अशी आशा आहे.”