Join us  

FAN MOMENT: केतकी माटेगावकरचा जबरा फॅन, तिला पाहताच झाला फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 2:57 PM

डान्स प्लस ४ च्या मंचावर प्रत्येक आठवड्‌याला ह्या स्पर्धकांना नियमितपणे त्यांच्यासाठी प्लस असणाऱ्या व्यक्ती भेट देत असतात, मात्र ह्या आठवड्‌याला चेतन साळुंखे त्याला भेटायला आलेल्या केतकीला पाहून थक्कच झाला.

'ही पोगरी साजुक तूपातली'''...... म्हणत  सोज्वळ केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप आतुर असतात. तिला खूश करण्यासाठी ना-ना त-हेच्या शक्कल लढवत असतात. असेच काहीसे डान्स प्लस 4 च्या मंचावरही पाहायला मिळाले.

डान्स प्लस ४ च्या मंचावर प्रत्येक आठवड्‌याला ह्या स्पर्धकांना नियमितपणे त्यांच्यासाठी प्लस असणाऱ्या व्यक्ती भेट देत असतात, मात्र ह्या आठवड्‌याला चेतन साळुंखे त्याला भेटायला आलेल्या केतकीला पाहून थक्कच झाला. विशेष म्हणजे केतकी माटेगावकर टीम पुनितमधील चेतन साळुंखेला भेटायला आली होती कारण तो तिचा खूप मोठा चाहता आहे. त्याच्या मोबाईल वॉलपेपरवरही केतकीचाच फोटो आहे. त्याच्या डान्स परफॉर्मन्सनंतर पुनित त्याच्याशी केतकीबद्दलच बोलत होता आणि तिने मागच्या बाजूने सरप्राईज एंट्री घेतली. तिला पाहून चेतनला खूपच आनंद झाला. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला पाहताना त्याला त्याच्या डोळ्‌यांवर विश्वासच बसत नव्हता.

केतकीने चेतनसाठी एक खास  गिफ्टही  आणले होते, ती म्हणाली, “तो केवळ एका चाहत्यापेक्षा अधिक आहे. जेव्हा तुम्ही चित्रीकरण करत असता, थकत असता, तेव्हा तुम्हांला अंजाही नसतो की दूर कुठेतरी कोणीतरी तुमच्यावर एवढे प्रेम करत आहे. चेतनने हा शो जिंकावा हे आता माझे स्वप्न आहे. लोक जिंकतात, पैसे कमावतात, पण चेतनला त्याच्या आईवडिलांची मान अभिमानाने उंचावायची आहे आणि म्हणूनच आम्ही बरोबरीचे आहोत. माझे आणि त्याचे विचार जुळतात. मीही चेतन आणि त्याचे परफॉर्मन्सेस फॉलो करत आहे. आता मी त्याची मोठी चाहती बनले आहे.”

तिने गायलेले त्याचे आवडते गीत मला वेड लागले आणि मैं तेनू समझावा की ही गाणी केतकीने गायली. त्यांनी चेतनच्या परफॉर्मन्सची पुनर्निर्मितीही केली ज्यात चेतनने एका मोठ्‌या कलाकाराचा चाहता साकारला.  या जबरा फॅनने  केतकीचं मन नक्कीच जिंकलं असेल यांत शंका नाही . 

टॅग्स :केतकी माटेगावकरडान्स प्लस 4