Join us  

​छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीला सेक्स रॅकेटमध्ये करण्यात आली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 6:47 AM

चेन्नई पोलिसांनी नुकतेच चेन्नईमधील पानायुरमधील एका प्रायव्हेट रिसोर्टमध्ये छापा घालून काही महिलांना अटक केले आहे. या महिला वेश्याव्यवसाय करत ...

चेन्नई पोलिसांनी नुकतेच चेन्नईमधील पानायुरमधील एका प्रायव्हेट रिसोर्टमध्ये छापा घालून काही महिलांना अटक केले आहे. या महिला वेश्याव्यवसाय करत असून त्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या छाप्यामध्ये काही महिलांना पडकले असून यातील एक महिला चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. दाक्षिणात्य भाषेतील मालिकांमध्ये वीना रानी ही अभिनेत्री प्रसिद्ध असून तिला या छाप्यात अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानायुरमधील एका प्रायव्हेट रिसोर्टमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या रिसोर्टमध्ये धाड टाकल्यानंतर तिथे संगीता या अभिनेत्रीला पाहून सगळ्यांनाच चांगला धक्का बसला. संगीता आणि तिच्या काही साथीदारांना अटक करण्यात आले असून संगीताचे पूर्ण नाव संगीता बालन आहे. तिने या मालिकेसोबतच काही तामिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. संगीता हे सेक्स रॅकेट चालवत असून दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींचा या रॅकेटमध्ये समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संगीतासोबत सतीश नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून मुलींना चित्रपटात, मालिकेत काम देण्याचे आमिष दाखवून मुलींनी या जाळ्यात ओढले जात असे.सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्रीला पडकण्याचे हे पहिलेच प्रकरण नाहीये. याआधी देखील अनेक अभिनेत्रींना सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आले आहे. श्वेता बासू प्रसादने कहानी घर घर की या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर इक्बाल, मकडी यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. तिला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. तिला पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली होती. शर्लिन चोप्रा, मिश्टी मुखर्जी, यमुना, भुवनेश्वरी, तेलगु अभिनेत्री सायरा बानू, आईश अन्सारी, नितू अग्रवाल, दिव्या श्री, यांसारख्या अभिनेत्रींना आजवर सेक्स रॅकेटमध्ये अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी हैद्राबादमधील बंजारा हिल्स परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा घातला होता. त्यावेळी दाक्षिणात्य अभिनेत्री रिचा सक्सेनाला अटक केली होती. रिचा देखील एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.  Also Read : श्वेता बासू प्रसादने वर्षभर लपवून ठेवली एवढी मोठी गोष्ट! अखेर झालाचं खुलासा!!