Join us  

'नच बलिये 9'तून बाहेर पडल्यानंतर या जोडीचे झाले ब्रेकअप, दोघांनी एकमेकांवर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 12:00 PM

'नच बलिये 9' हा रिअ‍ॅलिटी डान्स शो कमी आहे ड्रामा शो जास्त झाला आहे.  नचमधून बाहेर पडल्यानंतर फैजल खान आणि मुस्कान कटारिया यांचे ब्रेकअप झाले आहे.

'नच बलिये 9' हा रिअॅलिटी डान्स शो कमी आहे ड्रामा शो जास्त झाला आहे.  नचमधून बाहेर पडल्यानंतर फैजल खान आणि मुस्कान कटारिया यांचे ब्रेकअप झाले आहे. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार मुस्काने सांगितले आहे की, फैजलने माझा विश्वासघात केला आणि  म्हणून आमचं ब्रेकअप झालं. 

मुस्कानच्या या वक्तव्यानंतर फैजलने देखील आपला पक्षसमोर ठेवला आहे. रिपोर्टनुसार फैजला म्हणाला मी हे ऐकून हैराण आहे की मुस्कानने माझ्यावर फसवणुकीचा आरोप लावला आहे. मी कधीच कोणाला धोका नाही दिला. मला झालेल्या दुखापतीमुळे आम्हाला शो सोडावा लागला यामुळे आरोप माझ्यावर हे सर्व लावण्यात येत आहेत.

पुढे तो म्हणाला, मला असे वाटतेय केवळ प्रसिद्धीसाठी ती माझ्यासोबत होती. मुस्कानसोबत रिलेशनशीपमध्ये राहणं ही माझी आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक असल्याचे मला वाटतेय. यापुढे मी कोणालाही डेट करणार नाही आणि प्रेम करण्याची चूक आयुष्यात पुन्हा करणार नाही. मला वाटतंय मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो.  

मिळालेल्या माहितीनुसार फैजल चंद्रगुप्त मौर्या मालिकेतील आपली सहकलाकार स्नेहा वाघला डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र फैजलने स्नेहा आपली केवळ आपली चांगली मैत्रिण असल्याचे सांगितले आहे. 

टॅग्स :नच बलिये