Join us

सैराटच्या गाण्यांचा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 02:02 IST

          जीव झाला येडा पीसा... आवाज वाढव डिजे.... तुझ्या रुपाच चांदन पडलया याा गाण्यांची झिंग ...

          जीव झाला येडा पीसा... आवाज वाढव डिजे.... तुझ्या रुपाच चांदन पडलया याा गाण्यांची झिंग अजुनही तरुणांवर चढलेली आहे. चित्रपटातील गाणी एकदा फेमस झाली कि बस्स..  तो चित्रपट प्रेक्षकांनी पाहिला अन हिट झाला म्हणुनच समजा. आजकाल चित्रपट रिलिज होण्याच्या आधी गाण्यांचे प्रोमोज रिलिज केले जातात. गाणी गाजली, त्यांना हिट्स, लाईक मिळाले की चित्रपटाचे नाव सगळ््यांच्या ओठी येऊ लागते. अन गाण्यांसाठी तरी तो सिनेमा पाहिला जातो.                        नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री चित्रपटातील जीव झाला येडा पीसा हे गाणे खुप हिट झाले पण ते सिनेमात काही पहायला मिळाले नाही. आता नागराज मंजुळे त्यांच्या आगामी सैराट या सिनेमामध्ये देखील अशीच ऐका पेक्षा ऐक धामाकेदार गाणी घेऊन येत आहेत. येड लागल गं... आता  ग बया का बावरल या दोन गावरान तडका असलेल्या गाण्यांनंतर चित्रपटातील तिसरे साँग ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता आऊट होणार असल्याचे नागराज मंजुळे यांनी सोशल साईट्सवरुन सांगितले आहे. प्रेक्षकांमधील एक्साईटमेंट वाढविण्यासाठी आता अशा प्रकारे गाण्यांचे प्रोमो देखील आऊट करण्याची क्रेझ वाढत आहे. आता पाहुयात सैराटच्या या गाण्यांची नशा प्रेक्षकांवर किती चढतेय ते.