Exclusive : ओरिजनल रोशन परतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 14:43 IST
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत रोशनची भूमिका सध्या दिलखूश रिपोर्टर साकारत आहे. रोशन पती-पत्नीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच ...
Exclusive : ओरिजनल रोशन परतली
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत रोशनची भूमिका सध्या दिलखूश रिपोर्टर साकारत आहे. रोशन पती-पत्नीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. तिच्याआधी ही भूमिका जेनिफर मिस्त्री बनसिवाल साकारत होती. गरोदर असल्याने जेनिफरने ही मालिका सोडली होती. त्यामुळे गेली दोन वर्षं दिलखूश रोशनची भूमिका साकारत आहे. जेनिफरच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. आता दिलखूश तिच्या वैयक्तिक कारणामुळे ही मालिका सोडत आहे आणि या मालिकेत ओरिजनल रोशन परतत आहे. जेनिफरने या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवातदेखील केली आहे.