कट्टी बट्टी या मालिकेद्वारे पुष्कर सरदने केली छोट्या पडद्यावर एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 14:48 IST
झी युवा वाहिनीवरील कट्टी बट्टी या मालिकेत अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला ...
कट्टी बट्टी या मालिकेद्वारे पुष्कर सरदने केली छोट्या पडद्यावर एंट्री
झी युवा वाहिनीवरील कट्टी बट्टी या मालिकेत अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पुष्कर हा मुळचा यवतमाळ मधील असून एका शेतकरी कुटुंबातील आहे. त्याने २०१० पासून राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घ्यायला सुरुवात केली. यवतमाळ मधून पदवी घेतल्यानंतर त्याने २०१२ला मुंबई विद्यापीठात अॅकेडमी ऑफ थिएटर आर्टसमधून मास्टर ऑफ थिएटर आर्टमधून शिक्षण पूर्ण केले. छोट्या पडद्यावर पदार्पण करण्याआधी पुष्कर पृथ्वी थिएटर मध्ये सलीम आरिफ सरांसोबत नाटकांना लागणाऱ्या प्रकाशयोजनेचे काम करत होता. त्याने अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये सुद्धा काम केले आहे. झी युवा वरील कट्टी बट्टी या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. कट्टी बट्टी मधून लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी कासार हिचेही पुनरागमन झाले आहे. पुष्कर या मालिकेत पराग निकमची भूमिका साकारत असून तो व्यवसायाने प्राध्यापक असल्याचे दाखवण्यात आले आहे तर अश्विनी कासार या मालिकेत पूर्वा बोराडेच्या भूमिकेत असून तिला पीएचडी करायची आहे.अहमदनगर शहरात राहत असलेल्या पूर्वा बोराडे आणि पराग निकम यांच्या मोडलेल्या लग्नाची पण त्याचबरोबर निरागसपणे एकमेकांवर जडलेल्या प्रेमाची ही गोष्ट आहे. मालिकेची नायिका पूर्वा, ही महाराष्ट्रातील असंख्य मुलींचे प्रतिनिधित्व करतेय. एका शहरात राहणाऱ्या या दोन अपरिचित तरुणांचे एकमेकांसोबत ठरलेले लग्न मोडते. त्यांनतर त्यांच्यात झालेली मैत्री आणि जडलेले प्रेम हा प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला आहे. हलक्या फुलक्या विनोदी अंगाने जाणारी ही प्रेमकथा आहे.छोट्या पडद्यावरील पदार्पणाच्या उत्सुकतेविषयी बोलताना पुष्कर सरद सांगतो, छोट्या पडद्यावर काम करण्याची माझी ही पहिली वेळ आहे. कट्टी बट्टी या मालिकेची पार्श्वभूमी ही अहमदनगरची असल्याने भाषा शिकण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. संदेश कुलकर्णी यांनी आमच्या भाषेसाठी कार्यशाळा घेतल्या. या मालिकेतील अनेक कलाकार हे नगर आणि औरंगाबादमधील आहेत. तसेच या मालिकेचे शूटिंगसुद्धा अहमदनगरमध्ये होत आहे. या मालिकेमुळे मला खूप चांगले मित्र मिळाले आहेत. मी मालिकेच्या संपूर्ण टीमचा अत्यंत आभारी आहे. कारण प्रत्येकाच्या पाठिंब्यामुळे मी माझे १०० टक्के देऊ शकतोय. तसेच अश्विनी कासार आणि माझे ट्युनिंग खूप चांगलं जमतं आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करताना खूप छान वाटतंय.”Also Read : खुलता कळी खुलेना फेम अभिज्ञा भावे झळकणार कट्टी बट्टी या मालिकेत