Join us  

एकता कपूरच्या 'होम' वेबसीरिजचा येणार दुसरा सीझन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 12:15 PM

एकता कपूरच्या 'होम' वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

ठळक मुद्दे 'होम'ला मिळतोय सकारात्मक प्रतिसादएकता कपूरने मानले प्रेक्षकांचे आभार

 निर्माती एकता कपूर सध्या खूप चर्चेत आहे. कारण लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी की'चा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तिची निर्मिती असलेली वेबसीरिज होमला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. त्यामुळे 'होम' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचे संकेत स्वतः एकता कपूरने दिले आहे.

'होम'ला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे सोशल मीडियावर तिने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तिने फक्त आगामी एपिसोडचीच घोषणा केली नाही तर हे संकेत दिले की लवकरच एक प्रेरणादायक घराची सफर प्रेक्षकांना घडवण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी एकता कपूर, जितेंद्र कपूर यांनी घराशी निगडीत गोड आठवणी सांगितल्या होत्या. ज्याची फक्त प्रेक्षकांनीच नाही तर सिनेइंडस्ट्रीतल्या मंडळींनी प्रशंसा केली होती. अहाना कुमरा, नकुल मेहता, प्रिंस नरूला, कांची सिंग व अविका गोर या कलाकारंनी होमसोबतच्या आठवणी शेअर केल्या होत्या.  

होमला मिळत असलेला प्रतिसाद पाहून आबार मानत एकता कपूरने लिहिले की, होमने सर्वांच्या हृदयात घर केले आहे. या सीरिजबाबत येणारे मॅसेजमुळे खूप छान वाटत आहे. या सीझनचा दुसरा भाग म्हणजेच उर्वरीत सहा एपिसोड २१ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहेत. लवकरच मी एक होम यात्रा रिलीज करणार असून जे खूप प्रेरणादायी आहे. एकता कपूरने सोशल मीडियावर एका खास व्यक्तीचा उल्लेख केला आहे जो आपल्या घराची सफर घडवताना दिसतो आहे आणि हा व्यक्ती चित्रपट निर्मात्यांसाठी प्रेरणादायी व्यक्ती आहे.एकता कपूरची ऑल्ट बालाजी आणि दिग्दर्शक हबीब फैजल यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा सादर करण्यासाठी एकत्र आले आहेत. ज्यात आपले घर वाचवण्यासाठी कुटुंबातील सदस्य संघर्ष करताना दाखवले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या होम या वेबसीरिजच्या कथेने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या सीरिजमध्ये अनु कपूर, सुप्रिया पिळगावकर, अमोर पराशर व परिक्षीत साहनी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :सुंदर गृहनियोजन