Join us  

एकता कपूर म्हणते, तांत्रिकाची भूमिका साकारण्यासाठी हे बदल आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 3:19 PM

‘स्टार प्लस’वरील ‘कयामत की रात’ मालिकेचे कर्मचारी आणि कलाकार तसेच निर्माते हे सध्या उत्सवी वातावरणात आहेत. 

‘स्टार प्लस’वरील ‘कयामत की रात’ मालिकेचे कर्मचारी आणि कलाकार तसेच निर्माते हे सध्या उत्सवी वातावरणात आहेत.  आता या मालिकेची निर्माती एकता कपूरने या मालिकेच्या आगळ्या कथा-संकल्पनेवर आपले मत व्यक्त केले आहे. या मालिकेतील दुष्ट तांत्रिकाची व्यक्तिरेखा ही खलनायकची असली, तरी तीच प्रमुख व्यक्तिरेखा असून निर्भय वाधवा या अभिनेत्यने ती जिवंत साकारण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन परिश्रम घेतले आहे. त्याला या तांत्रिकाची रंगभूषा करण्यास तब्बल तीन तास लागतात आणि त्यानंतरचे त्याचे हे रूप हे भारतीय टीव्हीवरील सर्वात भीतीदायक खलनायकाचे रूप ठरले आहे.

कयामत की रात’ मालिकेच्या प्रारंभीच्या यशाबद्दल एकता कपूर म्हणाली, “कोणत्याही कथेतील थरारकता पाहताना खूपच मजा येते. ‘कयामत की रात’मध्ये एका दुष्ट तांत्रिकाची कथा सादर करण्यात आली आहे. त्यात प्रणय आणि लालसा या भावना अधिक ठळक असल्या तरी कथानकातील सूडाच्या कथेत अनेक नाट्यपूर्ण वळणे येतात आणि त्यामुळे प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतो. ही एक संपूर्णपणे कौटुंबिक मालिका असून एका तांत्रिकाच्या कारवायांना एक तरूण दाम्पत्य कसे तोंड देते, ते यात दाखविण्यात आलं आहे.”

त्यातील तांत्रिकाबद्दल तपशीलाने बोलताना एकता म्हणाली, “यातील तांत्रिकाचं रूप कसं असावं, यवर आम्ही कित्येक महिने विचार केला आणि शेवटी त्याच्या चेहऱ्यावर कृत्रिम अवयव बसविण्याचा निर्णय घेतला. मार्क ट्रॉय या रंगभूषेत जागतिक ख्याती मिळविलेल्या रंगभूषाकाराने हा तांत्रिकाचा लूक पूर्णपणे नव्याने तयार केला आहे. या तांत्रिकाचं रूप वास्तवदर्शी वाटावं, यासाठी अभिनेता निर्भय वाधवा याने आपल्या शरीरात उत्कृष्ट बदल केला आहे. त्यातील त्याची रंगभूषा मुद्दाम पाहण्यजोगी आहे.” 

टॅग्स :कयामत की रात