Join us

अर्जित रिअॅलिटी शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 12:23 IST

अर्जित सिंगची सगळीच गाणी रसिकांना प्रचंड आवडतात. आता अर्जित प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. रॉ स्टार हा ...

अर्जित सिंगची सगळीच गाणी रसिकांना प्रचंड आवडतात. आता अर्जित प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. रॉ स्टार हा कार्यक्रम काहीच दिवसांत सुरू होणार असून या कार्यक्रमात तो मेन्टॉरची भूमिका साकारणार आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांना तो गायनाचे धडे देणार आहे. रॉ स्टार हा कार्यक्रम इंडियाज रॉ स्टारचा सिक्वल नसल्याचे त्याने म्हटले जात आहे. इंडियाज रॉ स्टारमध्ये हनी सिंग झळकला होता. त्यामुळे अर्जित हनीची जागा घेतोय अशी चर्चा होती. यावर इंडियाज रॉ स्टार हा रॉ स्टारपेक्षा खूप वेगळा असणार असल्याने मी हनी सिंग यांची जागा घेत नाहीये असे अर्जित सांगतो. विशेष म्हणजे या या कार्यक्रमाचे ऑडिशन हे डिजिटल पद्धतीने घेतले जाणार आहे.