‘पिया अलबेला’तील अक्षय म्हात्रेचे नवे रूप तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 12:03 IST
पडद्यावर आपली भूमिका वास्तववादी वाटण्यासाठी काही अभिनेते खरोखरच विशेष मेहनत घेताना दिसतात. झी टीव्हीवरील पिया अलबेला या लोकप्रिय मालिकेत ...
‘पिया अलबेला’तील अक्षय म्हात्रेचे नवे रूप तुम्ही पाहिले का?
पडद्यावर आपली भूमिका वास्तववादी वाटण्यासाठी काही अभिनेते खरोखरच विशेष मेहनत घेताना दिसतात. झी टीव्हीवरील पिया अलबेला या लोकप्रिय मालिकेत नरेनची प्रमुख भूमिका साकारणारा अक्षय म्हात्रे हा अशाच मोजक्या मेहनती अभिनेत्यांपैकी एक आहे. आता या मालिकेत विविध रूपे घेतल्यानंतर अक्षय आता घागरा परिधान करणार आहे. आमीर खानने आपल्या ‘पीके’ चित्रपटात ज्याप्रमाणे घागरा घातला होता, तसाच काहीसा हा प्रकार आहे.पिया अलबेला या मालिकेच्या आगामी भागांमध्ये नरेन म्हणजेच अक्षय म्हात्रे आणि पूजा म्हणजेच शीन दास हे एका गावात जातात, पण रस्ता चुकतात आणि नंतर ते एका खड्ड्यात पडतात. खड्ड्यातील चिखलामुळे त्यांचे कपडे खराब होतात आणि त्यामुळे गावातील लोकांनी दिलेले कपडे घालण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. पण तेव्हा पूजाप्रमाणेच नरेनही घागरा घालून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देतो. इतकेच नव्हे, तर घागरा घातलेला असतानाच पूजाची छेड काढत असलेल्या काही गुंडांशीही तो दोन हात करतो!घागरा परिधान करण्याच्या अनुभवाविषयी विचारले असता अक्षय सांगतो, “सुरुवातीला मला घागरा घालून चित्रीकरण करण्याबाबत काहीसा संकोच वाटत होता. पण मला कोणत्या परिस्थितीत घागरा घालावा लागला होता, त्याचं कारण लक्षात आल्यावर मला उलट या पोशाखात काम करण्याचा उत्साह आला. जीन्स अथवा पँट घालून घालून हाणामारीचे प्रसंग करण्यापेक्षा घागरा घालून ते करणं मला अधिक सोपं वाटतं, कारण घागरा घातल्यावर तुमच्या पायांच्या हालचाली मुक्तपणे होऊ शकतात. तो एक विलक्षण अनुभव होता.”पिया अलबेला या मालिकेत नरेनच्या भूमिकेत यापूर्वी अक्षयने विविध वेश आणि रूपे धारण केलेली आहेत. आता घागरा घालून अॅक्शन प्रसंग साकारायला मिळत असल्याने तो खूपच खूश आहे.पिया अलबेला ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. या मालिकेत पूजा आणि नरेन या भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेने नुकताच लीप घेतला आहे. Also Read : मैंने प्यार किया या चिपटातील हा सीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार पिया अलबेला या मालिकेत