Join us  

आईच्या कडेवर असलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आहे ती लोकप्रिय चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 6:00 AM

भूमिकेत जीव ओतून काम करणं आणि वेगळी ओळख निर्माण करणं, ही तिच्या अभिनयाची खासियत आहे.

सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे ही सेलिब्रिटी मंडळी अनेकदा त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच मध्यंतरी अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या बालपणीचे किंवा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करत नवा ट्रेंड सुरु केला होता. याच दरम्यान आता एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो चर्चेत आला आहे.

फोटोत आईच्या कडेवर असलेली ही मुलगी मराठी कलाविश्वातील आज प्रसिद्ध चेहरा आहे. नाटकांपासून तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. ही अभिनेत्री आहे रश्मी अनपट. रश्मीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर रश्मी सक्रिय असते आपले फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

रश्मीने  स्वभावाला औषध नाही. गाठीभेटी या नाटकांमध्ये तिने काम केले. यानंतर ती सुवासिनी मालिकेत झळकली होती. 'पुढचं पाऊल,' ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’ या मालिकांमध्ये रश्मीने काम केले. कुलस्वामिनी' या मालिकेमुळे रश्मीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. रश्मीचा पती अमित खेडेकर हा देखील अभिनेता आहे. अमित हा देखील अभिनेता असून त्याने हृदयांतर, हिरकणी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

टॅग्स :टिव्ही कलाकार