Join us  

फोटोतील या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 10:08 AM

मराठमोळी ही अभिनेत्री आता इतकी बदलली आहे की तिला या फोटोवरून ओळखणंही अशक्य आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी घराघरात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणीला अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. मधुराणीचे चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. दरम्यान मधुराणीने नुकताच तिचा जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या पहिल्या फोटोशूटचा आहे.

मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, मुंबईत आल्यानंतरचं माझं पहिलं वहिलं फोटो शूट...सुकन्या कुलकर्णी मोने या माझ्या ज्येष्ठ सखीने मला ह्या अमेझिंग फोटोग्राफरचं नाव सुचवलं... आशीष सोमपुरा... ! त्यावेळी त्याच्या फीज खूप वाटल्या होत्या... ते पैसे कसेंबसेच जमवले होते ह्यावेळीपण त्याची माझी पहिल्या भेटीतच मैत्री झाली... मी नवीन होते तरी मला त्यांनी कम्फर्टेबल  केलं.. मुख्य म्हणजे तो त्याच्या मॉडेल्सला अतिशय आदराने वागवतो... ही त्याची मोठी क्वॉलिटी...ह्या फोटोशूट वर मी पुढे खूप काम केलं... खूप जाहिराती केल्या.... हे शूट खूप खास आहे माझ्यासाठी....चल आशिष, परत करूया असं एक मस्त फोटोशूट.

मधुराणी प्रभुलकर हिने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. आई कुठे काय करते या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही दिसली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिकास्टार प्रवाह