Join us  

कधीकाळी B- ग्रेड चित्रपटांत काम करायची तारक मेहताची दयाबेन, आज आहे कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 8:09 AM

तारका मेहतामध्ये काम करणाऱ्यापूर्वी दिशाने बी-ग्रेड सिनेामध्ये काम केलं होत. पण हा सिनेमा कधी आणि कधी गेला हे कोणालाच कळले नाही.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतून घराघरात पोहोचलेली दयाबेन (Dayaben) म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीचा (Disha Vakani) आज वाढदिवस. दिशा वकानीचा जन्म 17 ऑगस्ट 1978 ला गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाला होता. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधून दयाबेन 2017पासून मालिकेतून गायब आहे. पण तिच्या भूमिकेने आजही लोकांच्या मनात घर केलेलं आहे. तिचे डायलॉग आजही लोकांना पाठ आहेत. 

दिशा वकानी तारक मेहता मालिकेतून प्रसिद्ध झाली होती. पण त्याआधी तिने फारच मेहनत घेतली होती. 1997 साली आलेल्या ‘कमसिन: द अनटच्ड’ या चित्रपटात तिने बोल्ड सीन दिले होते. हा सिनेमा कधी आणि कधी गेला हे कोणालाच कळले नाही

२००८ हे वर्ष दयाासाठी थोड्याफार प्रमाणात चांगले ठरले. या वर्षात तिने  ‘जोधा अकबर’, ‘सी के कंपनी’ आणि ‘लव स्टोरी 2050’ सारखे सिनेमात काम केले. इतकेच नाही तर  सिनेमात साईड एक्टरची भूमिका साकारणारी दिशाला तारक मेहता मालिकेत मुख्य भूमिका मिळाली ख-या अर्थाने तिच्यासाठी लकी ठरली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांनी दिशाला या मालिकेत परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते, परंतु त्यांना यात यश मिळालं नाही. Bollywoodlife.com च्या वृत्तानुसार, दयाबेनला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका एपिसोडसाठी दीड लाख रूपये मिळत होते. ज्यामुळे ती २०१७ मध्ये दर महिन्याला २० लाख रूपये कमाई करत होती.

दयाबेन ही कोट्यावधी रूपयांची मालक आहे. तिच्या एकूण संपत्तीबाबत वाचून तुम्हीही हैराण व्हाल. दयाबेनकडे एकूण संपत्ती ३७ कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातं. त्यासोबतच तिच्या एक लग्झरी कारही आहे. दिशा वकानीने ड्रॅमेटिक आर्ट्समधून शिक्षण घेतलं आहे. तर तिने मयूर पहाडीसोबत २०१५ मध्ये लग्न केलं. त्यानंतर तिने मालिकेत काम करणं बंद केलं. दिशा आज दोन मुलांची आई आहे. 

टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा