Join us  

अस्सा नवरा सुरेख बाई! शोएब इब्राहिम पत्नी दीपिका कक्करची हॉस्पिटलमध्ये घेतोय अशी काळजी !!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 7:15 AM

'कोई लौट के आया है' या मालिकेत देखील दिपिका आणि शोएबने एकत्र काम केले होते. या मालिकेतील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

टीव्ही इंडस्ट्रीतील दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. शोएब दीपिकाची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. सध्या काही दिवसांपासून दीपिका आजारी आहे. तिला उपचारासाठी हॉस्पिटमध्ये भरती करावे लागले.  दिवस रात्र एक करून शोएबने तिची काळजी घेत आहे. दीपिका आजारी असल्यामुळे  शोएबने शूटिंगमधून थोडे दिवस ब्रेक घेत पूर्णपणे तिलाच वेळ देत आहे . दीपिकाचे हॉस्पिटलमधले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. हे फोटो पाहून  दीपिकाने अगदी योग्य जोडीदार निवडला अशा अनेक प्रतिक्रिया  फोटो पाहून उमटत आहेत.  

खरंतर दीपिकाचे शोएब बरोबर हे दुसरे लग्न आहे. 'ससुराल सिमर का' या मालिकेत एंट्री होण्याआधी दीपिकाचे लग्न झालेले होते. मात्र काही कारणास्तव तिचे लग्न तुटले... त्यानंतर तिच्या कठीण काळात शोएबने तिला आधार दिला आणि तिची मदत केली. दुसरीकडे शोएबच्या पडत्या काळात दीपिकानेही त्याला साथ दिली. त्याच्या पाठिशी ठामपणे ती उभी राहिली. मात्र तोवर एकमेकांना ते प्रेमात असल्याचे जाणवले नव्हते. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. रेशीमगाठीत अडकण्याआधी  दोघे खूप चांगले मित्र होते. मात्र शोएबने 'ससुराल सिमर का' ही मालिका सोडल्यानंतर दोघांनाही एकमेकांची कमतरता जाणवू लागली.

या काळात दिपिका फार खचून गेली होती. त्यानंतर  दोघे जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तीन-साडे तीन वर्ष त्यांनी एकमेंकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकल्याचा निर्णय घेतला होता. 'कोई लौट के आया है' या मालिकेत देखील दिपिका आणि शोएबने एकत्र काम केले होते. या मालिकेतील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडली होती. दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमने 'नच बलिये' या कार्यक्रमात देखील एकत्र भाग घेतला होता. 

टॅग्स :दीपिका कक्कर