Join us  

'करिश्मा का करिश्मा'मधील चिमुकली झालीय आता इतकी मोठी, लेटेस्ट फोटो पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 7:00 AM

अनेक मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात.

अनेक मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. त्यांचे लेटेस्ट बघून त्यांना ओळखणं ही कठीण झालायं. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अशाच एका बालकलाकारबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. ९०च्या दशकात करिश्मा का करिश्मा आणि सोनपरी या मालिका खूप गाजल्या होत्या. ‘करिश्मा का करिश्मा’ या मालिकेत रोबोटची भूमिका साकारणारी बालकलाकार आता मोठी झाली आहे. तिची ही भूमिका बच्चेकंपनीसह तमाम रसिकांना भावली होती. तसेच झनक शाहरूख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान स्टारर 'कल हो ना हो' या सिनेमातही झळकली होती. 

करिश्मा का करिश्मामध्ये रोबोटीची भूमिका झनक शुक्ला(Jhanak Shukla)ने साकारली होती. यामालिकेमुळे झनक घराघरात पोहोचली होती. तिला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली. मात्र आता हीच झनक काय करते?, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही. आज तिचा बदललेला लूक पाहून आपण पाहातच राहाल. 

झनक(Jhanak Shukla) आता मोठी झाली आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. आपले फोटो ती नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते पण यात तिला ओळखणं कठीण आहे. झनकला फिरण्याचीही खूप आवड आहे. वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत ती तेथील संस्कृती जाणून घेत तिथले खास गोष्टी कॅम-यात कैद करत असते.भविष्यात झनकला सामाजिक कार्य करायची इच्छा आहे.

विशेष झनक(Jhanak Shukla)ची आई टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. सुप्रिया शुक्ला असे तिच्या आईचे नाव आहे. त्यामुळे बालपणापासून अभिनयाचे बाळकडू झनकला आईकडूनच मिळाले. सुप्रिया शुक्ला कुमकुम भाग्य मालिकेत आणि मै हुँ हिरो तेरा सिनेमातही झळकल्या आहेत. 

टॅग्स :झनक शुक्लाटिव्ही कलाकार