Join us  

रामायण मालिकेत झळकण्यापूर्वी बी-ग्रेड सिनेमातही केले आहे काम, फोटो पाहून बसणार नाही तुम्हालाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 4:21 PM

यशाच्या शिखरावर असतानाचा दीपिका यांनी हेमंत टोपीवालासह लग्न केले. या कपलला दोन मुली आहेत. जुही आणि निधी अशी त्यांची नावं आहेत.

 'सीता' ही भूमिका निभावणाऱ्या दीपिका चिखलिया यांना रामायण या पौराणिक मालिकेतून प्रचंड पसंती मिळाली. वयाच्या १४ वर्षापासून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. लहानवयातच दीपिका जाहीरातींमध्ये झळकल्या होत्या. दीपिका यांच्या वडीलांना त्यांचे अभिनय क्षेत्रात काम करणे अजिबात पसंत नव्हते. पण दीपिकाच्या आईचा या कामासाठी पूर्ण सपोर्ट होता. दीपिकाला जेव्हा रामायणची ऑफर मिळाली तेव्हा त्या केवळ १६ वर्षाच्या होत्या.

दीपिकाला सीताचा रोम मिळवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली होती. जवळपास २५ लोकांनी यासाठी स्क्रीनटेस्ट दिल्या होत्या. यावेळी ज्याचे चेह-याचे हावभाव. संवाद कौशल्य यार बारकाईने लक्ष देण्यात आले होते. यासगळ्यांमध्ये दीपिकाने दिलेली टेस्ट पसंतीस उतरली आणि सीतासाठी त्यांचे नाव सिलेक्ट करण्यात आले. 

सीता या भूमिकेने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले होते, घराघरात देवीप्रमाणे त्यांची पूजा केली जायची. त्यांची लोकप्रियता इतकी होती की, खुद्द राजीव गांधीनी देखील दीपिका यांना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रण दिले होते. दीपिकाला सारेच सीता याच इमेजमध्ये बघू लागले. रामायणनंतर कितीही प्रयत्न केला तरी ही इमेज त्या ब्रेक करु शकल्या नाही.

दीपिका यांनी 'रामायण' मालिकेत झळकण्याआधी अनेक सिनेमांतही काम केली आहेत. 'भगवान दादा' (1986), 'रात के अंधेर में' (1987), 'खुदाई' (1994), 'सुन मेरी लैला' (1985), 'चीख' (1986), 'आशा ओ भालोबाशा' (बंगाली, 1989) आणि 'नांगल' (तमिल, 1992) अभिनेत्री म्हणून त्या झळकल्या. मात्र सिनेमांतून त्यांना हवे तसे यश मिळाले नाही.यामधले काही सिनेमे तर ब्री-गेड होते.

यशाच्या शिखरावर असतानाचा दीपिका यांनी हेमंत टोपीवालासह लग्न केले. या कपलला दोन मुली आहेत. जुही आणि निधी अशी त्यांची नावं आहेत. लग्नानंतर अभिनयात फारशा एक्टीव्ह नव्हत्या.

 

हेमंतसह त्यांच्या कंपनीचे मार्केटींग हेड म्हणून त्या काम करत राहिल्या.निवांत वेळेत त्या पेटींग करतानाही दिसतात. अभिनयासोबत त्यांना पेेंटीगचीही फार आवड आहे. त्यांची ही आवडही त्यांनी जोपासली आहे.

टॅग्स :रामायण