Join us  

काय सांगता? ‘तारक मेहता...’च्या ‘या’ कलाकाराने साकारला होता ‘कोई मिल गया’चा ‘जादू’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 4:51 PM

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. अगदी ...

ठळक मुद्देअलीकडे ‘कोई मिल गया’ चित्रपटाला 18 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. अगदी मालिकेतील प्रत्येक पात्र आपल्याच घरातील पात्र वाटावं, इतकं प्रेम या मालिकेला मिळालं. तूर्तास आम्ही बोलतोय ते मालिकेतील दयाबेनबद्दल. दयाबेन दीर्घकाळापासून गायब आहे. पण आता तिच्या व ‘कोई मिल गया’ (Koi Mil Gaya) या सुपरडुपर हिट चित्रपटातील ‘जादू’चं एक नातं उघडं झालं आहे. आता दयाबेन व जादू यांच्यात काय नातं असू शकतं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या एका एपिसोडमध्ये हा जादू दयाबेनचा काका म्हणून दिसला होता. 

होय, जादू ही भूमिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील अभिनेते इंद्रवदन पुरोहित (Indravadan Purohit) यांनी साकारली होती. त्यांनीच मालिकेत दयाबेनच्या दूरच्या काकाची भूमिका साकारली होती.

इंद्रवदन आज या जगात नाहीत. 18 सप्टेंबर 2014 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी जवळपास सहा भाषांमध्ये काम केले आहे.  इंद्रवदन यांची उंची तीन फूट असल्यामुळेच त्यांना जादूची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.  त्यांनी लहान मुलांची प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘डुबा डुबा-2’मध्ये भूमिका साकारली होती.

अलीकडे ‘कोई मिल गया’ चित्रपटाला 18 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने जादूसोबत त्याचा फोटो शेअर केला होता. ‘हे त्याच्यासाठी ज्याने रोहितचं आणि वैयक्तिकरित्या माझ्या आयुष्यात आनंद आणला. माझ्या आयुष्यात जादू निर्माण केली. जादूने रोहितचा हात पकडला, त्याच्या जखमा भरल्या,  जादू जेव्हा रोहितच्या आयुष्यात आला तेव्हा तो फक्त तीन वर्षांचा होता. 18 वर्ष झाली आता तो 21 वर्षांचा झालाय. कधी कधी मी विचार करतो की आज तो कसा दिसत असेल?’, असं हृतिकनं लिहिलं होतं. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माहृतिक रोशन