Join us  

धनश्री काडगांवकरचा फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 10:31 AM

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

'तुझ्यात जीव रंगला' मधील वहिनीसाहेब या भूमिकेमुळं धनश्रीचा प्रचंड मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. . मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता.भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते. ऑनस्क्रीन तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. 

आता ऑफस्क्रीन ती तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना याड लावत आहे.तिचे वेगवेगळे लुक्स देखील अनेकदा चर्चेचे विषय ठरतात.  धनश्रीनं तिचे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.  समुद्र किनाऱ्यावर धनश्रीनं हे फोटोशुट केलं असून या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. 

तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्स पसंती देत असल्याचे पाहायला मिळते. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे  धनश्रीचे हे फोटो काहीसे वेगळा ठरत आहेत.धनश्री सध्या फिटनेस फ्रीक झाल्याचेदेखील सोशल मीडियावर पहायला मिळतेय. सोशल मीडियावर तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ ती शेअर करत असते.

टॅग्स :धनश्री काडगावकर