Join us  

वहिनीसाहेबांच्या घरी चिमुकल्याचं आगमन, धनश्रीने चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 9:43 PM

भिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकरच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता वहिनी या व्यक्तीरेखेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकरच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. धनश्रीनं गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी तिनं सोशल मीडयाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत  शेअर केलीय.. धनश्री आणि तिचा चिमुकला दोघे ही अगदी सुखरुप असल्याचे सांगितलं आहे.. धनश्रीनं पोस्टमध्ये सर्वांनी दिलेल्या आशीर्वादाचे आभार मानलेत... धनश्रीवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. 

धनश्री प्रेग्नेंट असल्याचं समोर आल्यापासून ती नेहमीच बेबी बम्पचे फोटो शेअर करत होती.  बाळाच्या आगमनाची काडगावकर कुटुंबासह  चाहत्यांना ही तितकीच उत्सुकता होती.. अखेर धनश्री आणि दुर्वेशच्या बेबी बॉयचं आगमन झालंय.

धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते. धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

त्यानंतर ती गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकांमध्ये झळकली. विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.

टॅग्स :धनश्री काडगावकर