Join us  

Devmanus 2 : अखेर डॉक्टरचा खेळ संपणार, ‘देवमाणूस 2’ बंद होणार; ‘ही’ नवी मालिका येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 5:49 PM

Devmanus 2  : ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड गाजली होती. इतकी की, ही मालिका संपते ना संपते तोच या मालिकेचा दुसरा सीझन आला होता. अर्थात दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांची निराशा केली.

Devmanus 2  : ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड गाजली होती. इतकी की, ही मालिका संपते ना संपते तोच या मालिकेचा  दुसरा सीझन आला होता. अर्थात दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांची निराशा केली. पहिल्या भागाइतकी मालिकेच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही.  तरिही मालिका सुरू आहे आणि आता या मालिकेला प्रेक्षक वैतागल्याचे चित्र आहे. अनेक प्रेक्षक सोशल मीडियावर मालिकेतील एकापाठोपाठ एक येणाऱ्या  ट्वीस्टवर नाराजी व्यक्त करत आहेत. मालिका संपवा, अशी मागणीही करत आहेत. तर आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे.

होय, गेल्या काही दिवसांपासून मालिकेत सुरू असलेलं कथानक पाहता ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. कारण काय तर नवी मालिका.

होय, लवकरच झी मराठी वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला. ‘आप्पी आमची कलेक्टर’ असं या मालिकेचं नाव आहे. नुकतंच या मालिकेचं शूटींग सुरू झालं. ही मालिका ‘देवमाणूस’ची जागा घेणार, असं मानलं जात आहे. अर्थात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण चर्चा जोरात आहे.

वज्र प्रोडक्शननं  ‘आप्पी आमची कलेक्टर’मालिकेची निर्मिती केली आहे. मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदेने संजय खांबे यांच्यासोबत मिळून वज्र प्रॉडक्शन सुरु केलं आहे.  वज्र प्रोडक्शनने याआधीही झी मराठीवरील अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. देवमाणूस, लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री,  छोटी मालकीण यासारख्या मालिकांचा यात समावेश आहे.     

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाझी मराठीटेलिव्हिजन