Join us

विकास खन्नाने का घेतला ब्रेक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 17:28 IST

मास्टर शेफ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणारा विकास खन्ना हा सगळ्यांचाच खूप लाडका आहे. भारतातील शेफना सेलिब्रेटी स्टेटस मिळवून ...

मास्टर शेफ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणारा विकास खन्ना हा सगळ्यांचाच खूप लाडका आहे. भारतातील शेफना सेलिब्रेटी स्टेटस मिळवून देण्यात विकासचा मोठा हाता आहे. विकास या आधीच्या सगळ्याच मास्टर शेफच्या सिझनमध्ये झळकला होता. त्यामुळे विकास हा मास्टशेफचा चेहरा म्हणूनच ओळखला जातो. सध्या तो मास्टर शेफच्या चित्रीकरणात व्यग्र असला तरी या चित्रीकरणातून वेळ काढून काही दिवसांसासाठी त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेला होता. विकास हा मुळचा पंजाबचा आहे. त्याचे सगळे बालपण हे पंजाबमध्ये गेले. त्यानंतर तो करियरच्या निमित्ताने परदेशात गेला. आज तो जगभर फिरत असला तरी त्याचे पहिले प्रेम हे पंजाबच आहे. त्यामुळे त्याला वेळ मिळाला की तो पंजाबला जातो. आतादेखील दिवाळीमध्ये तो पंजाबला गेला होता. त्याने त्याची ही दिवाळी आपल्या कुटुंबियांसोबत तिथेच साजरी केली. विकास त्याच्या आईचा अतिशय लाडका आहे. तो लहान असताना आई जेवण बनवताना तो किचनमध्येच थांबायचा. आईमुळेच माझ्यात जेवण बनवण्याची आवड निर्माण झाली असे तो अनेकवेळा सांगतो. पंजाबमध्ये त्याने आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळीला खूप सारी मजा मस्ती केली. पण दिवाळीत त्याने सगळ्यात जास्त बहिणीला मिस केले. बहिणीला भेटायला न मिळाल्याची खंत त्याने सोशल मीडियावर व्यक्त केली. त्याने त्याच्या बहिणीसोबतचा एक लहानपणीचा फोटोदेखील सोशल मीडियावर अपलोड केला होता. पंजाबमध्ये गेल्यावर त्याने आई आणि भावासोबत अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शनदेखील घेतले. त्यामुळे ही दिवाळी त्याने खूप चांगल्याप्रकारे साजरी केली असे तो सांगतो.