Join us  

कुल्फीकुमार बाजेवाला या मालिकेमुळे आकृती शर्माच्या कुटुंबियांनी घेतला हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 4:43 PM

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या लोकप्रिय दैनंदिन मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणाऱ्या आकृती शर्माचे नाव आता घरोघरी पोहोचले असून असंख्य प्रेक्षक तिच्या कामगिरीवर खुश आहेत.

ठळक मुद्दे‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेतील कुल्फीची मध्यवर्ती भूमिका मिळाल्यापासून आकृती आपल्या आईसह मुंबईत राहात आहे. आता या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून त्यामुळे कुल्फीच्या वडिलांनी आपली मुंबईत बदली करून घेतली आहे. माझे पप्पा आता अखेरीस आमच्याबरोबर मुंबईत राहू लागल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. तब्बल आठ महिन्यांपूर्वी मी आणि माझी आई या मालिकेसाठी मुंबईत आलो आणि आता माझे बाबाही आमच्यासोबत राहू लागले आहेत.

‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या लोकप्रिय दैनंदिन मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणाऱ्या आकृती शर्माचे नाव आता घरोघरी पोहोचले असून असंख्य प्रेक्षक तिच्या कामगिरीवर खुश आहेत. कुल्फीवर असलेल्या प्रेक्षकांच्या या प्रचंड प्रेमापोटीच तिचे सारे कुटुंबीय दिल्ली सोडून आता मुंबईत स्थायिक झाले आहेत.

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेतील कुल्फीची मध्यवर्ती भूमिका मिळाल्यापासून आकृती आपल्या आईसह मुंबईत राहात आहे. आता या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून त्यामुळे कुल्फीच्या वडिलांनी आपली मुंबईत बदली करून घेतली आहे. याविषयी तिचे वडील हरी शर्मा सांगतात, “लहान असल्यापासूनच आकृतीला विविध कलांची फार आवड होती. तिला नृत्य, अभिनय आवडत असे आणि तिला चित्रं काढायलाही फार आवडते. आकृतीला कुल्फीकुमार बाजेवाला मालिकेत भूमिका मिळाल्यावर प्रथम तिची आई तिच्याबरोबर दिल्लीहून मुंबईत राहू लागली. आता मी माझी बदली मुंबईत करून घेतली असून त्यामुळे आम्ही सर्वजण आता एकत्र राहू शकतो. माझ्या मुलीच्या डोळ्यांत मला अभिनयाबद्दल मनापासून आवड असल्याचं दिसतं आणि म्हणूनच तिच्या हितासाठी आम्ही दोघांनी मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय एकमताने घेतला.”

याबद्दल आपला आनंद व्यक्त करताना आकृती शर्मा सांगते, “माझे पप्पा आता अखेरीस आमच्याबरोबर मुंबईत राहू लागल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. तब्बल आठ महिन्यांपूर्वी मी आणि माझी आई या मालिकेसाठी मुंबईत आलो आणि आता माझे बाबाही आमच्यासोबत राहू लागले आहेत. त्यांच्याबरोबर चित्रं काढणं आणि त्यांनी माझे फोटो काढणं या साऱ्या गोष्टी मी मिस करत होती. आता ते इथे आल्यामुळे ते माझे अनेक फोटो काढतील आणि मी त्यांना घेऊन गेमिंग झोनमध्ये खेळायला जाईन. ते कधी कधी आमच्या सेटवर येऊन माझी भेट घेतात, तेही मला खूप आवडतं. मला आता अखेरीस माझ्या कुटुंबियांबरोबर राहता येत असल्यामुळे मी फार आनंदात आहे.”

आता कुल्फीला तिच्या वास्तव जीवनातील वडिलांबरोबर राहता येत असून लवकरच पडद्यावरील तिच्या पित्याचीही तिला ओळख पटणार आहे. कुल्फीच्या जीवनात हा आनंदाचा दुहेरी धमाका होणार आहे, असे दिसते.

कुल्फीच्या जीवनातील सर्वात मोठा गौप्यस्फोट 5 डिसेंबर रोजी ‘कुल्फीकुमार बाजेवाला’मध्ये रात्री 8.30 ‘स्टार प्लस’वर होणार आहे.  

टॅग्स :कुल्फी कुमार बाजेवाला