Join us

केवळ दोन आठवड्यात घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 13:55 IST

मानसी श्रीवास्तव आणि मोहित अबरोल गेली अनेक वर्षं नात्यात आहेत. मानसीने ससुराल सिमर का या मालिकेत काम केले होते. ...

मानसी श्रीवास्तव आणि मोहित अबरोल गेली अनेक वर्षं नात्यात आहेत. मानसीने ससुराल सिमर का या मालिकेत काम केले होते. त्या दोघांनी केवळ दोन आठवड्यात साखरपुडा करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यविषयी मानसी सांगते, "मोहितचा भाऊ अबू धामीला राहतो. तो वर्षातून एकदा केवळ काही दिवसांसाठी भारतात येतो. तो यंदा आल्यावर आमच्या साखरपुड्याविषयी ठरले. आम्ही केवळ दोन आठवड्यात सगळी तयारी केली. साखरपुडा घाईगडबडीत केला असला तरी लग्न मोठ्या थाटात पुढच्या वर्षी चंढीगड येथे करण्याचे ठरवले आहे."