डीडीएलजीचे दृश्य मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:02 IST
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेची टीम नुकतीच चित्रीकरणासाठी स्विझर्लंडला गेली होती. या मालिकेतील विविध दृश्यांचे आणि काही ...
डीडीएलजीचे दृश्य मालिकेत
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेची टीम नुकतीच चित्रीकरणासाठी स्विझर्लंडला गेली होती. या मालिकेतील विविध दृश्यांचे आणि काही गाण्याचे चित्रीकरण तिथे करण्यात आले. या स्विझर्लंडच्या चित्रीकरणात प्रेक्षकांना एक खास गोष्ट पाहायला मिळणार आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल यांच्यावर चित्रीत झालेले ट्रेन पकडतानाचे दृश्य आज इतके वर्षं झाले तरी एव्हरग्रीन आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतही नुकतेच कार्तिक आणि नैरावर हे दृश्य चित्रीत करण्यात आले. नैरा सतत संशय घेत असल्याने कार्तिक कंटाळून एकटाच निघून जातो आणि ट्रेन पकडतो. पण ट्रेन सुटण्याच्या क्षणी नैरा तिथे येते आणि ट्रेनमध्ये चढण्यासाठी कार्तिक तिला हात देतो असे ते दृश्य आहे. हे दृश्य चित्रीत करण्यासाठी शिवांगी जोशी आणि मोहसिन खान हे दोघेही खूपच उत्सुक होते.