Join us  

डान्स+ च्या पाचव्या सिझनमध्ये भाग घेण्याची पुणेकरांना मिळणार संधी, वाचा पुण्यातील ऑडिशन्सविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 6:00 AM

‘डान्स+’ या कार्यक्रमासाठी भारतातील विविध भागांमध्ये ऑडिशन्स होणार आहेत.

ठळक मुद्देया कार्यक्रमाच्या पाचव्या आवृत्तीसाठी पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी ज्ञानेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रीसर्च, एसकेपी कॅम्पस, बालेवाडी, पुणे- 411 045 येथे सकाळी 9.00 वाजल्यापासून ऑडिशन्सची फेरी घेतली जाणार आहे.

‘डान्स+’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड आवडता असून या कार्यक्रमाचा पाचवा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पाचव्या सिझनची सध्या जोरदार तयारी सुरू झाली असून या कार्यक्रमासाठी ऑडिशन्स देखील घेतली जात आहेत. देशभरातील होतकरू नर्तकांना आपल्या नृत्यकौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी ‘डान्स+’ हा कार्यक्रम हे एक मोठे व्यासपीठ बनले आहे. नामवंत नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा असून या कार्यक्रमातील स्पर्धकांना त्याचे नेहमीच मार्गदर्शन मिळते आणि त्यामुळे त्यांना आपले नृत्यकौशल्य अधिक चांगले करण्यासाठी मदत मिळते.

‘डान्स+’ या कार्यक्रमाने अनेक दर्जेदार नर्तकांना जगापुढे आणले आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमातून अनेक गुणी नर्तकांना आपली कला जगापुढे सादर करता आली आहे. किंग्ज युनायटेड या नृत्यचमूने जागतिक नृत्यस्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. त्यांंनी देखील या कार्यक्रमात आपली प्रतिभा सादर केली होती. तसेच सुशांत खत्री आणि हाऊस ऑफ सूरज यांसारख्या नामवंत नर्तकांनाही या कार्यक्रमानेच संधी दिली.

आता या कार्यक्रमासाठी भारतातील विविध भागांमध्ये ऑडिशन्स होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील तुमची नृत्यकला लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर नजीकच्या ऑडिशन्स केंद्रावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करावी. कोणी सांगावे, तुम्ही कदाचित देशाचे नवे डान्स आयकॉनही बनाल! अधिक माहितीसाठी www.danceplus.co.in. या संकेतस्थळाला भेट द्या. 

या कार्यक्रमाच्या पाचव्या आवृत्तीसाठी पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी ज्ञानेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रीसर्च, एसकेपी कॅम्पस, बालेवाडी, पुणे- 411 045 येथे सकाळी 9.00 वाजल्यापासून ऑडिशन्सची फेरी घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी www.danceplus.co.in या संकेतस्थळाला भेट द्या. ‘डान्स+’ या कार्यक्रमाच्या पाचव्या आवृत्तीमध्ये होतकरू नर्तकांना आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना पाहा फक्त ‘स्टार प्लस’वर!

टॅग्स :डान्स प्लस 4