Join us  

छोटया पडद्यावरील ‘क्रश’ पर्सनॅलिटीज!

By अबोली कुलकर्णी | Published: August 19, 2018 7:08 PM

काही शोजचे हिरो किंवा हिरोईन्स आपले क्रश असतात. शिवाय रिअ‍ॅलिटी शोजमधील होस्ट यांच्यावर तर आपण मनोमन खूप प्रेम करत असतो. आपला क्रशही त्यांच्यावर असतो.

चित्रपट पाहणं आपल्याला कितीही आवडत असले तरीही आपलं पहिलं प्रेम हे टीव्हीच असतं. त्यातच खास करून काही शोजचे हिरो किंवा हिरोईन्स आपले क्रश असतात. शिवाय रिअ‍ॅलिटी शोजमधील होस्ट यांच्यावर तर आपण मनोमन खूप प्रेम करत असतो. आपला क्रशही त्यांच्यावर असतो. अशाच काही पर्सनॅलिटीज ज्या कायमच छोटया पडद्यावरच्या ‘क्रश’ पर्सनॅलिटीज असतात. पाहूयात कोणकोणत्या पर्सनॅलिटीज आहेत ज्यांची प्रेक्षकांना कायमच भूरळ पडलेली असते.

* राजीव खंडेलवाल‘कही तो होगा’ या मालिकेतून अभिनेता राजीव खंडेलवाल हा प्रेक्षकांच्या ओळखीचा झाला. त्याचा हॅण्डसम अंदाज कायमच प्रेक्षकांना भूरळ घालतो. विशेषत्वाने तरूणींचा तर तो लाडका  असतो. अनेक मालिकांत आणि चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली. 

* अय्याज खान ‘काव्यांजली’, आणि ‘क्या होगा निम्मो का’ या मालिकांमध्ये अभिनेता अय्याज खान याने काम केले आणि तो रातोरात स्टार झाला. त्याची ‘बॅड बॉय ’ इमेज देखील सास-बहु मालिकांमध्ये सगळयांना आवडत असते. त्याशिवाय त्याने ‘तन्नु वेड्स मन्नू’ मध्ये जस्सीची भूमिका केली आहे. त्याच्या भूमिकेची बरीच प्रशंसा झाली. तो सगळयांच तरूणींना खूप जास्त हॉट वाटायचा. 

* गुरमीत चौधरी‘यह मेरी लाइफ हैं’ आणि ‘कुमकुम’ अशा मालिकांमध्ये गुरमीतने मुख्य भूमिकेत व्यक्तिरेखा साकारली. त्याने पडद्यावर अनेक अभिनेत्रींबरोबर रोमँटिक भूमिका साकारल्या. ब्लेझरमधील त्याचा रूबाबदार लूक नक्कीच घायाळ करणारा असायचा.

* आमना शरीफ ‘कही तो होगा’ या मालिकेपासून अभिनेत्री आमना शरिफ हिचे नाव वारंवार तरूणपिढीत घेतले जात होते. ती सर्व युवकांची क्रश होती. मालिकेसोबतच तिने ‘एक व्हिलेन’ चित्रपटामध्येही काम केले आहे. तिची फिगर आणि अदा यांचे अक्षरश: प्रेक्षक दिवाने होते.

* श्रुती सेठ ‘शरारत’ या कॉमेडी मालिकेत श्रुती सेठ ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. ‘फना’ आणि ‘राजनीती’ या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. तिची बबली इमेज कायमच पडद्यावर सगळयांना भूरळ घालायची. तसेच तिने इव्हेंटचे होस्टिंगही केले. ती नेहमीच छोटया पडद्यावर एक क्रश पर्सनॅलिटी आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजन