Join us

आणखी एक टीव्ही कपल प्रेमात,प्रेमात असल्याची दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 15:43 IST

'जीज माँ या मालिकेच्या सेटवर सध्या लव्ह इज इन द एअर अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याच्या खुमासदार चर्चा सध्या ...

'जीज माँ या मालिकेच्या सेटवर सध्या लव्ह इज इन द एअर अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याच्या खुमासदार चर्चा सध्या रंगल्या आहेत.भाविका शर्मा आणि सुभाशीष झा यांची रिल लव्ह स्टोरी आता रियल लाइफमध्येही सुरु झाल्याचं बोललं जात आहे. दोघंही प्रेमाच्या नात्यात बुडाल्याचं बोललं जात आहे.भाविका शर्मा आणि सुभाशीष एकमेकांना पसंत करत असून बराच काळ एकत्र घालवत आहेत.दोघांमधील हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट बनत चाललं आहे.निव्वळ मैत्री या शब्दांपलीकडे या दोघांच्या नात्याकडे पाहिलं जात आहे.या प्रेमाच्या नात्याची आणि दोघंही एकत्र बराच काळ घालवत असल्याची कल्पना मालिकेच्या सेटवरही प्रत्येकाला आलीच आहे.एकमेकांसाठी खूप स्पेशल असल्याचे सेटवरही सा-यांनाच कळाले आहे.दोघे एकत्रच बाहेर जातात,एकत्रच जेवतात,शूटिंग करतात आणि दोघेही एकमेकांबरोबर भरपूर ‘सेल्फी’ काढत असतात.या दोघांच्या नात्यांमध्ये प्रेमाचे वारे वाहु लागल्याचे कळते आहे.भाविका आणि सुभाशीष हे दोघे ऑनस्क्रीन रोमँटीक कपल म्हणून खूप पसंत केले जाते.त्यामुळेच वास्तव जीवनातही हे नाते निर्माण करावे अशीच चाहत्यांचीही इच्छा असणार.या दोघांचे लाखो फॅन्स आहेत.त्यामुळे ऑनस्क्रीन रंगणा-या या कपलची लव्ह स्टोरी आता वास्तविक जीवनातही फुलु लागल्यामुळे चाहत्यांनाही या दोघांनी एक सुखद धक्काच दिला आहे. Also Read:राजीव पॉल सांगतोय या कारणांनी मी मालिकांपासून दूर होतोराजीव पॉलने कहानी घर घर की, अभिमान, यस बॉस यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो आता ‘जीजी माँ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तो छोट्या पडद्यापासून दूर होता. आता तो या मालिकेद्वारे कमबॅक करत आहे. त्याच्या या कमबॅकबाबत तो खूपच उत्सुक आहे. तो त्याच्या सेकंड इनिंगला सुरुवात करत असल्याचे त्याला वाटत आहे. राजीव छोट्या पडद्यापासून दूर राहाण्यामागे एक खास कारण होते. तो गेल्या नऊ वर्षांपासून लिलेट दुबेबरोबर वेडिंग अल्बम हे नाटक करत आहे. तसच टीव्हीवर परतण्यासाठी तो एका चांगल्या भूमिकेच्या शोधात होता.