Join us

देवाशप्पथमध्ये श्लोक कुहूला देणार त्याच्या प्रेमाची कबुली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 12:38 IST

टेलिव्हिजनवरची एक निरागस जोडी म्हणजे देवाशप्पथ मधील  श्लोक आणि कुहूची . यांचं प्रेम आता एका नव्या वळणावर पोहोचत आहे. ...

टेलिव्हिजनवरची एक निरागस जोडी म्हणजे देवाशप्पथ मधील  श्लोक आणि कुहूची . यांचं प्रेम आता एका नव्या वळणावर पोहोचत आहे. दोघांनीही आपण एकमेकांना आवडत असल्याची मूक कबुली दिली आहे. दोघांमध्ये प्रेमळ नोकझोक देखील होत आहे. पण अजूनही दोघांनी एकमेकांना उघडपणे प्रेमाची कबुली दिली नाही आहे.  सध्या मालिकेत कुहूला मिळालेल्या नाण्याचा मागील सत्याचा शोध सुरु आहे . कुहूला त्या नाण्यामागील सत्य शोधून श्लोक ला मदत करायची आहे पण श्लोकचा या कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही . कुहू श्लोकला हरिपूरला तिच्या कामासाठी जायचं आहे हे सांगते. आणि त्यालाही कामातून थोडी विश्रांती मिळावी हा तिचा प्रयत्न यशस्वी होतो. श्लोक आणि कुहू प्रवासाला निघतात. या प्रवासा दरम्यान त्यांना एका हॉटेल मध्ये मुक्काम करावा लागतो.  आता या मुक्कामात कुहू आणि श्लोक त्यांच्या मनातील एकमेकांबद्दलच्या प्रेम भावना व्यक्त करतील का?  दोघेही प्रेमाची कबुली देतील का ? श्लोक त्याच्या मनातील प्रेम कुहूला सांगेल का ? हे आपल्याला लवकरच कळेलआज पर्यंत अनेक पौराणिक मालिका प्रेक्षकांनी पहिल्या आहेत, पण देवाशप्पथ ही आजच्या काळातील गोष्ट असून आधुनिक काळातही देव त्याच्या भक्ताशी कश्याप्रकारे जोडला आहे,श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे एक वेगळ्या नजरेतून प्रेक्षक अनुभवत आहेत.त्याचप्रमाणे जर देवाला आजच्या काळात खरंच पृथ्वीतलावर यायला लागलं तर काय गंम्मत घडेल हे सुद्धा या मालिकेतून पहायला मिळत आहे.'देवाशप्पथ' ही एक पूर्णपणे वेगळी संकल्पना असून या मालिकेतून आम्ही देव आणि भक्ताचे सुंदर नाते दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे.