Join us

दुखापत होऊनही चित्रीकरण केले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 15:06 IST

अभिनेता मयांक गांधी काला टीका या मालिकेत नंदू या गतीमंद मुलाची भूमिका साकारत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच ...

अभिनेता मयांक गांधी काला टीका या मालिकेत नंदू या गतीमंद मुलाची भूमिका साकारत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी त्याला नुकतीच मोठी दुखापत झाली. दुखापत होऊनदेखील त्याने थोडाही आराम न करता मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात केली. याविषयी मयांक सांगतो, "मला हाताने एका गाडीची काच फोडायची होती. पण काच फोडताना मी हात काचेवर इतक्या जोरात आदळला की, माझ्या बोटातून रक्त वाहू लागले. मालिकेच्या टीमने माझ्यावर लगेचच प्राथमिक उपचार केला. पण बोटाला संपूर्ण चीर पडल्यामुळे माझा हात बराच दुखत होता. मात्र दृश्याची सगळी तयारी झाली असल्याने मी त्याच अवस्थेत चित्रीकरण पूर्ण केले. पॅकअपनंतर मी डॉक्टरांकडे गेलो आणि उपचार घेतले."