Join us  

कॉमेडीयन भारती सिंह इतक्या कोटींची मालकीण, संपत्तीचा आकडा पाहून येईल तुम्हालाही भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 4:27 PM

भारती सिं छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. भारतीने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. भारतीचा पंजाब ते मुंबई हा प्रवास सोपा नव्हता.

तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय कॉमेडीयन भारती सिंहने शिवाय तिने एक स्टॅँडअप कॉमेडीयन म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या भारती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एनसीबीने ड्रग्स प्रकरणात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगच्या घरी छापे टाकले. एनसीबीने भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोव्या इथल्या घरी धाड टाकली. भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाला समन्स पाठवला आहे. 

भारती सिं छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. भारतीने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. भारतीचा पंजाब ते मुंबई हा प्रवास सोपा नव्हता. यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. भारतीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते, मी केवळ दोन वर्षांची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. मी लहानपणापासूनच खूप काम केले आहे. माझ्या आईने तर प्रचंड हालअपेष्ठा सहन केल्या आहेत. तिने आमच्यासाठी खूप काही केले आहे. आम्ही तीन भाऊ-बहीण असून तिने आम्हाला तिघांनाही खूप चांगले शिक्षण दिले. 

भारती सिंग पुढे म्हणाली, 'मी माझ्या कूपनमधून दिवसाला पाच रुपये वाचवायची आणि महिन्याच्या शेवटी घरी फळं आणि रस घेऊन जायचे. त्यावेळी दोन वेळेचे जेवायचे हाल होते. अशा परिस्थितीत घरात फळ बघून आनंद व्हायचे. त्या काळात मी अमृतसरमध्ये थिएटर करायचे. रसिकांची लाडकी कॉमेडीयन भारतीच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही.  

 

रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली भारती आज मोठ्या मेहनतीने कोट्यावधीची मालकीण बनली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार भारती एका शोमधून सुमारे 7-8 लाखांची कमाई करते. तिला अ‍ॅवॉर्ड शो आणि इतर वेगवेगळ्या कार्यक्रम होस्ट करण्याची भली मोठी रक्कम दिली जाते. विशेष म्हणजे भारती सिंह भारती सिंह टीवी कलाकारांमध्ये सर्वाधिक कमाई करणारी कलाकार आहे. टीव्ही कलाकारांमध्ये सर्वाधिक कमाई करणा-या  100 इंडियन एंटरटेनर्स फोर्ब्सच्या यादीत भारतीचे नाव आहे. 

तिचे वार्षिक उत्पन्न 7 कोटींच्या घरात आहे. याशिवाय  अनेक तिच्याकडे  आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन  आहे. ऑडी क्यू 5 आणि मर्सिडीज-बेंझ जीएल 350 असून त्याशिवाय मुंबईतही एक आलिशान घर आहे. भारती सिंगची देशभरात मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिचे 3 डिसेंबर 2017 रोजी हर्ष लिंबाचियाशी लग्न झाले आहे. लग्नानंतर भारतीने आपले काम सुरूच ठेवले आहे. 

टॅग्स :भारती सिंग